बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांकडून कोरोना योध्दाचां सन्मान - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांकडून कोरोना योध्दाचां सन्मान

बँक ऑफ महाराष्ट्र कर्मचाऱ्यांकडून कोरोना योध्दाचां सन्मान
पनवेल : प्रतिनिधी


बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियनने लॉक डाउन बाधितांना मदतीचा हात देऊन, कोरोना योद्धांचा केला सन्मान
बँकिंग उद्योगातील ए.आय,बी,ई.ए. शी संलग्न असलेली बहुसंख्य संघटना बँक ऑफ महाराष्ट्र एम्प्लॉईज युनियन, मुंबईने लॉक डाउन बाधितांना अन्नदान देऊन मदतीचा मोठा हात दिला व ह्या आव्हानात्मक परिथितीत जीवाची बाजी लावून कोरोना योद्धा म्हणून अविरत कार्य करणाऱ्या डॉक्टर्स, पोलीस, पत्रकार, पनवेल महानगरपालिकेचे स्वच्छता दूत यांचा संघटनेतर्फे सन्मानपत्र देऊन गौरव करण्यात आला.
या प्रसंगी संघटनेचे संघटन सचिव, अरविंद मोरे, गुरुद्वारा नवीन पनवेलचे अध्यक्ष हरविंदर सिंग बुटर, बँकेचे मुख्य प्रबंधक दिनेश परमार, शाखा प्रबंधक प्रतिमा जाधव व सामाजिक कार्यकर्ते प्रदीपराव देशमुख, विश्वजीत मारवाह  आदी मान्यवर उपस्थित होते.
या प्रसंगी संघटनेचे संघटन सचिव, अरविंद मोरे म्हणाले की, ए.आय,बी,ई.ए. संघटना ही कर्मचाऱ्याच्या  हिता  सोबतच सामाजिक कार्य सुद्धा करण्यासाठी नेहमी अग्रेसर असते आणि ह्याच संकल्पनेतून संघटनेने गुरुद्वारा मार्फत आम्ही अन्नदान करून लॉक डाउन बाधितांना मदतीचा हाथ दिला व ह्या आवाहनात्मक परिस्थितीत जे गेली ९१ दिवसांपेक्षा जास्त अविरत लॉक डाउन बाधितांना  मदत करीत आहे असे कोरोना योद्धा डॉक्टर्स, पोलीस, पत्रकार, महानगर पालिकेचे स्वच्छता दूत, महाराष्ट्र राज्य विद्युत मंडळाचे कर्मचारी व सामाजिक कार्यकर्ते यांचा सन्मान पत्र देऊन गौरव करण्यात  आला. अरविंद मोरे म्हणाले की, गुरुद्वाराने  लॉक डाउन काळात खूप मोलाचे कार्य केले आहे. त्यांनी दररोज १४००० लोकांना मदतीचा  हाथ दिला असून आता पर्यंत रु.१.२५ करोड ची मदत केली आहे.
या प्रसंगी गुरुद्वाराचे अध्यक्ष मा. हरविंदर सिंग बुटर जी म्हणाले की, बँक ऑफ महाराष्ट्राच्या युनियनने मदत देऊन खूप मोलाचे कार्य केले असून ह्या परिस्थितीत त्यांचे कार्य खरोखरच प्रशंसनीय असून त्यांच्या कार्याचे आम्ही मोठ्या दिलाने कौतुक करतो.
संघटने तर्फे पत्रकार मयूर तांबडे, प्रवीण मोहोकर, नितीन कोळी, शैलेश चव्हाण, दीपक घरत, अनिल कुरघोडी, पोलीस कर्मचारी  संतोष शिंदे, दत्तात्रय शिंदे, महेश अहिरे, स्वच्छता दूत, रवी पालसिंग बहोत, श्रीपाद नाईक, शिवाजी चिरकार, सतीश चिंडालीया, विद्युत महामंडळाचे कर्मचारी व अधिकारी अतुल चव्हाण, राजेंद्र थोरात व गुरुद्वाराचे पदाधिकारी हरविंदरसिंग बुटर, बलविंदरसिंग  सैनी, जगजितसिंग बुटर, गुरुदेवसिंग चावला, हैप्पी सिंग व अमरजित सिंग  यांचा सन्मानपत्र देऊन सत्कार करण्यात आला. तसेच नवी मुंबईचे उद्योजक व समाजसेवक आनंद चौगुले यांनी पोलीस स्टेशन, गोरगरिबांना सतत लॉक डाउनच्या काळात अन्नदान व बिहार कडे
जाण्याऱ्या श्रमिक  रेल्वे गाड्यात सुद्धा अन्नपुरवठा केल्या बद्दल विशेष कौतुक करून सत्कार करण्यात आला.
सत्काराला उत्तर देतांना पोलीस दत्तात्रय शिंदे म्हणाले की, संघटनेने जो आमचा सन्मान केला त्याबद्दल आम्ही त्यांचे खूप आभार मानतो व त्यांना शुभेच्छा देतो.
संघटनेचे पदाधिकारी गोपीचंद पाटेकर म्हणाले की, लॉक डाउन बाधितांना मदतीचा हात व कोरोना योद्धांचा सन्मान करून समाजाला एक चांगला संदेश देण्याचा उद्देश होता म्हणून आम्ही आज ह्या कार्यक्रमाचे आयोजन केले आहे.
या प्रसंगी संघटनेचे पदाधिकारी गोपीचंद पाटेकर, बाबू जाधव, दत्ता डावरे, मंगेश भालेराव व महाबँकेचे शाखा प्रबंधक, गीता वर्दम, शैलजा ठकेकर, विजयकुमार पाटील व कर्मचारी अभिषेक परब, स्वाती परब, कमलेश सराफ, वामनराव गायकवाड व सतीश पारधे आदी मान्यवर उपस्थित होते.
कार्यक्रमास यशस्वी करण्यास अस्मिता गुणे, स्वेता कारंजकर, नीलिमा खोपकर, अमोल पवार, शिवाजी दळवी, जया लक्ष्मी,  मीनाक्षी भाकरे, कीर्तना, सानिका ताम्हाणे, चंद्राकांत जाधव, सीमा मराठे, नरेश यादव, सुनेत्रा परांजपे, अंकिता दुर्गे आदींनी अथक परिश्रम घेतले.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0