पनवेलमध्ये कोरोनाचे १३१ रुग्ण : ४ जणांचा मृत्यू
पनवेल : लढवय्या रोखठोकपनवेल महानगरपालिका क्षेत्रामध्ये आज कोरोना ने शंभरी गाठलेली असून आज तब्बल १३१ नवे रुग्ण आढळून आलेले आहेत
त्यामध्ये ६१ रुग्ण बरे तर ४ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
आजच्या कोरोनाच्या च्या १३१ या आकडेवारी नंतर पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील एकूण कोरोना बाधितांचे आकडा हा २०१४ वर पोहोचला आहे.
गेल्या काही दिवसांपासून पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील शहरांची परिस्थिती गंभीर झालेली असून कोरोना ने या शहरांमध्ये तसेच गाव खेडे परिसरात आपले हात पाय पसरून थैमान घातलेले आहे .
या वाढत्या कोरोना रुग्णांवर आळा घालण्यासाठी पनवेल महानगरपालिका प्रशासनाचे हात तोकडे पडत असल्याचे समोर येत आहे .
पनवेल महानगरपालिकेला लाभलेले नवीन आयुक्त सुधाकर देशमुख यांच्याकडून योग्य अशी पावले परिसरातील कोरोना आटोक्यात आणण्यासाठी उचलली जात आहेत मात्र तरीदेखील पालिकेच्या विविध अडचणींमुळे कोरोना वर नियंत्रण आणण्यासाठी अपयश पालिकेच्या हाती लागत असल्याचे स्पष्ट होत आहे.
पनवेल महानगरपालिका परिसरात वाढत असलेल्या कोरोना बाधित रुग्णांचे मुख्य कारण म्हणजे ज्या ज्या ठिकाणी कोरोना रुग्ण आढळत आहेत त्या त्या परिसरात कोरंटाईन करण्याचे दिले जाणारे आदेश वेळेवर पोहोचत नसल्याची धक्कादायक बाब सूत्रांच्या माध्यमातून समोर आलेली आहे या कोरोनाची आकडेवारी गोळा करण्यासाठीजी यंत्रणा का काम करत आहे या यंत्रणेकडून निष्काळजीपणाने दिरंगाई होत असल्याचे देखील समोर येत आहे.
एखादा रुग्ण पॉझिटीव्ह आल्यानंतर त्याच्या सोसायटीला किंवा तो रुग्ण ज्या व्यक्तींच्या संपर्कात आला आहे त्या त्या व्यक्तीन पर्यंत तसेच सोसायटींना कोरंटाईन करण्याचे आदेश वेळेवर मिळत नसल्याने दिवसेंदिवस मोठ्या प्रमाणात कोरोना चा आकडा हा वाढताना दिसत आहे या समस्येबाबत सामाजिक कार्यकर्ते तसेच रॉबिनहूड आर्मी चे दीपक सिंग यांनी याबाबत पनवेल महानगरपालिका आयुक्तांना ई-मेल द्वारे पत्र व्यवहार केलेला असून या महत्त्वाच्या गोष्टींवर प्रकाश टाकण्याचा प्रयत्न केलेला आहे. त्यामुळे निष्काळजी पणा करणाऱ्यावर कारवाई करावी अशी मागणी आता होऊ लागली आहे
आज सापडलेल्या या रुग्णांमध्ये
पनवेल कळंबोली नवीन पनवेल खारघर तळोजा कामोठे या भागात मोठ्या प्रमाणात संसर्ग दिसून येत आहे
पनवेल शहरी भागात कोरोनाचे ३३ रुग्ण आढळलेल्या आहेत तसेच खारघर मध्ये ३३ कामोठे मध्ये २३ कळंबोलीत २० खांदा कॉलनी परिसरात ८ नवीन पनवेल मध्ये ६ तळोजात ७ रुग्ण आढळले आहेत.
तर पनवेल ,नवीन पनवेल ,कामोठे, कळंबोली या ठिकाणी प्रत्येकी एक अशा ४ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे तर शहरातील ६१ रुग्ण आज पूर्णपणे बरे झालेले आहेत