पनवेल ग्रामीण उरण परिसरात कोरोनाचे ८ रुग्ण तर चौघांना डिस्चार्ज
पनवेल : प्रतिनिधीलढवय्या रोखठोक
पनवेल ग्रामीण व उरण परिसरात कोरोनाचे नव्याने ८ रुग्ण आढळले असून ४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.
पनवेल ग्रामीण मध्ये ५ व उरण परिसरात ३ अशा ८ रुग्णांचा समावेश आहे .
पनवेल ग्रामीण मधील विचुंबे येथील ओम साई घरकुल येथील ३ रुग्ण आढळले आहेत .
त्याच प्रमाणे उलवे येथील मापले याठिकाणी १ तर उलवे येथील सेक्टर १९ येथे १ असे एकूण ५ तर उरण मधील नागाव , सोनारी व जे एन पि टी याठिकाणी प्रत्येकी १ असे ३ रुग्ण आढळले आहेत .
तर कसळखंड , चिपळे , करंजाडे व कारंजा या ठिकाणचे ४ रुग्ण बरे झालेले आहेत .