पिडिलाईट , टि.आय. ए. च्या वतीने तळोजा पोलिसांना पीपीई किट वाटप - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पिडिलाईट , टि.आय. ए. च्या वतीने तळोजा पोलिसांना पीपीई किट वाटप

पिडिलाईट , टि.आय. ए. च्या वतीने तळोजा पोलिसांना पीपीई किट वाटप

पनवेल . (वार्ताहर) 

    संपूण नवी मुंबई मधील पोलिस कर्मचारी सध्या आपला जीव मुठीत घेवून जनतेच्या सेवेसाठी अहोराञ मेहनत घेत आहेत. त्यांची हि सुरक्षा तितकीच महत्वाची आहे जेवढी जनतेची. जनतेचा पोलिस कर्मचारी सुरक्षित तर जनता सुरक्षित राहू शकते. या हेतुने नवी मुंबईतील पोलिस आयुक्तालयाच्या अधीन असलेल्या पोलिस कर्मचार्‍यांना वैयक्तिक संरक्षणात्मक किट वितरित करण्यासाठी भारत आधारित अ‍ॅडव्हाईज मॅन्युफॅक्चरिंग कंपनी पिडिलाईट इंडस्ट्रीज जी फेविकॉल आणि फेविक्विक ब्रँडसाठी प्रसिद्ध आहे. तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनचे अध्यक्ष सतीश शेट्टी यांनी पिडिलाइट उद्योगांच्या वतीने तळोजा पोलिस ठाण्याचे वरिष्ठ निरीक्षक काशिनाथ चव्हाण यांच्याकडे १८० वैयक्तिक संरक्षक किट हस्तांतरित केल्या. तसेच डिसीपी झोन २ मध्ये अशोक दूधे यांच्याकडे ५८० वैयक्तिक संरक्षण किट सुपूर्द करण्यात आल्या. तसेच संपूण नवी मुंबई व पनवेल परिसरात पाच हजार वैयक्तिक संरक्षण किट येत्या दोन दिवसात वितरित करणार असल्याचे सतिश शेट्टी यांनी म्हटले आहे. टीआयएने माहिती दिली की प्रत्येक  संरक्षक किटमध्ये १० फेस मास्क, २ हातचे दस्ताने, १ सॅनिटायझर, इत्यादी साहित्याचा समावेश आहे.
तळोजा इंडस्ट्रीज असोसिएशनने (टीआयए) तळोजा एमआयडीसी मधील उद्योगांना संपर्क साधून तळोजा एमआयडीसी मधील गरीब लोकांसाठी अन्नधान्याच्या पिशव्या खरेदी व वाटप करण्यात मदत करणे. कोविड १९ ला लढा देण्यासाठी आवश्यक असलेल्या वैद्यकीय उपकरणे / तरतुदींच्या खरेदीसाठी मदत करणे या साठी उद्योजकांनी पुढे येण्याची आव्हान केले होते. त्या आवाहनाचा आधार घेऊन, तळोजा एम.आय. डी.सी. मधील पिडिलाइट इंडस्ट्रीज लिमिटेड पुढे आले आणि त्यांनी नवी मुंबई पोलिस आयुक्तालयाला वैयक्तिक संरक्षक किट वाटप करण्याची इच्छा टि.आय.ए.चे अध्यक्ष सतीश शेट्टी यांच्याकडे केली. त्यानंर टि.आय.ए चे अध्यक्ष सतिश शेट्टी यांनी पुढाकार घेवून तळोजा पोलिस स्टेशनचे वरिष्ठ पोलिस निरिक्षक काशिनाथ चव्हाण यांच्याकडे १८० वैयक्तिक संरक्षण किट सुफूद केल्या. तसेच डीसीपी झोन २  चे अशोक दुधे यांच्याकडे ५८० वैयक्तिक संरक्षण किट सुपूर्द करण्यात आले. यावेळी बाबू जॉर्ज, प्रोप्रायटर - बी.जी. एंटरप्राइझ,  बीनू पपाचन, मुख्य कार्यकारी अधिकारी बी.जी.इन्टरप्राइझ, टि.आय.ए चे अध्यक्ष सतिश शेट्टी आणि श्री सुनील पाध्ये, कार्यकारी सचिव - टीआयए उपस्थित होते.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0