कोरोनाने ३ रुग्ण दगावले : पनवेल महापालिकेत ८ रुग्णांची नोंद - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

कोरोनाने ३ रुग्ण दगावले : पनवेल महापालिकेत ८ रुग्णांची नोंद


  कोरोनाने ३ रुग्ण दगावले
पनवेल महापालिकेत ८ रुग्णांची नोंद
पनवेल : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक

पनवेल महानगरपालिका परिसरातील आज धक्कादायक घटना समोर आली आहे
  आज एकूण ८ रुग्णाची नोंद करण्यात आलेली असून ३ रुग्णांचा कोरोनाने मृत्यू झाला आहे .
  खारघर, सेक्टर-३४, साई मन्नत बिल्डिंग येथील ३६ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेली आहे. ही व्यक्ती सेबी भवन-२, बीकेसी, मुंबई येथे एजीएम म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
 कामोठे सेक्टर-६, शितलधारा कॉम्प्लेक्स येथील २३ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिलेच्या कुटुंबातील तीन व्यक्ती याआधी कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या होत्या. त्यांच्यापासूनच या महिलेला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
  खारघर सेक्टर-३४, सिमरन सफायर सोसायटी येथील ३४ वर्षीय १ व्यक्ती कोविड-१९ पॉझिटिव आलेली आहे. ही व्यक्ती मुंबई एअरपोर्ट येथे CISF सुरक्षा रक्षक म्हणून कार्यरत आहे. सदर व्यक्तीला एअरपोर्ट मथूनच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
  खारघर सेक्टर-३, मातोश्री बिल्डिंग येथील ३५ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती अपोलो हॉस्पीटलमध्ये कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष
   कामोठे सेक्टर-३४. मानसरोवर कॉम्प्लेक्स येथील एकाच कुटुंबातील २ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिक आलेल्या आहेत.
त्यापैकी ५४ वर्षीय एका महिलेला ब्लडप्रेशर व लिव्हर इंन्फेक्शनचा त्रास असून हो महिला दिनांक ४/०५/२०२० रोजी गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल झाली होती. आजरोजी त्यांचे दुख:द निधन झाले आहे. सदर महिलेची सुन कामोठे येथील ऑल इज वेल हया क्लिनिकमध्ये काम करीत असून तिच्यापासूनच हया महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
 कामोठे सेक्टर-११, साईकृपा कॉम्प्लेक्स येथील ७० वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेली आहे. ही व्यक्ती दिनांक ५/०५/२०२० रोजी गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल झाली होती. सदर व्यक्तीला डायबेटीसचा त्रास असून आजरोजी त्यांचे दुखद निधन झाले आहे.
खांदा कॉलनी सेक्टर-७ श्रीगणेश बिल्डिंग येथील ५२ वर्षोय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती अदानी एनर्जी कंपनी, गोवंडी, मुंबई येथे कार्यरत होतो. सदर व्यक्तीला कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाला असून ते दिनांक ४/०५/२०२० रोजी गंभीर अवस्थेत रूग्णालयात दाखल झाले होते. आजरोजी त्यांचे दुख:द निधन झाले आहे.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0