पनवेल ग्रामीण भागात कोरोनाचे दोन बळी : नव्याने ८ रुग्णांची वाढ , तर १० जणांची कोरोनवर मात
पनवेल : प्रतिनिधीलढवय्या रोखठोक
पनवेल ग्रामीण भागात आज कोरोना ने २ जणांचा बळी घेतलेला आहे.
यामध्ये उमरोली या ठिकाणी चा १ व पाली देवद सुकापुर याठिकाणी १ अशा २ व्यक्तींचा कोरोना मुळे मृत्यू झालेला आहे तर आज नवीन ८ रुग्ण पनवेल ग्रामीण भागात आढळलेले आहेत.
आज आढळलेल्या ८ रुग्णांनातर ग्रामीण भागातील एकूण कोरोना संख्या १४२ इतकी झाकी आहे .
पाली देवद सुकापुर याठिकाणी १ व्यक्ती , चिपळे याठिकाणी एकूण ३ व्यक्ती आष्टे याठिकाणी १ व्यक्ती त्याचप्रमाणे करंजाडे याठिकाणी २ व्यक्ती व विचुंबे याठिकाणी १ व्यक्ती अशा आज ८ नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद ग्रामीण भागात झालेली आहे .
दिलासादायक बातमी म्हणजे कोरोना वर उपचार घेत असलेले १० रुग्ण पूर्णपणे बरे झालेले आहेत त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे.
यामध्ये विचुंबे ,उलवे ,कोप्रोली ,पाली देवद सुकापुर ,करंजाडे या भागांचा समावेश आहे