तळोजा एमआयडीसीत कोरोनाचा शिरकाव : दिपक फर्टीलायझर मध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

तळोजा एमआयडीसीत कोरोनाचा शिरकाव : दिपक फर्टीलायझर मध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण

तळोजा एमआयडीसीत कोरोनाचा शिरकाव : 

दिपक फर्टीलायझर मध्ये आढळला कोरोनाचा रुग्ण 


तळोजा : प्रतिनिधी

लढवय्या रोखठोक


 पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना ची लागण झपाट्याने वाढताना दिसत आहे आत्तापर्यंत शहरी भागात तसेच ग्रामीण भागात या भयंकर विषाणूंचा प्रादुर्भाव होत असताना आता तळोजा औद्योगिक वसाहतीमध्ये या महाभयंकर कोरोना चा प्रसार होताना दिसत आहे .
 नवीन पनवेल परिसरात राहणाऱ्या एका व्यक्तीला आज कोरोना असल्याचे निष्पन्न झालेला असून धक्कादायक बाब म्हणजे हा व्यक्ती तळोजा औद्योगिक वसाहतीमधील नामांकित  दीपक फर्टीलायझर कंपनीमध्ये कार्यरत असल्याचे समोर आले आहे व त्याला कामाच्या ठिकाणीच कोरोनाची लागन झाल्याचं  आज पनवेल महानगरपालिकेने आपल्या या तपशिलात स्पष्ट म्हटलेले आहे .
  त्यामुळे आता तळोजा एमआयडीसी भागात भीतीचे वातावरण पसरलेले आहे तळोजातील नामांकित अशा कारखान्यांमध्ये ही कोरोना ची लागण होत असल्याने या कारखान्यांमध्ये हे काम करणाऱ्या इतर कर्मचाऱ्यांच्या सुरक्षितेचा प्रश्न निर्माण झालेला आहे


महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0