पनवेलमध्ये कोरोनाचे ५ नवे रुग्ण
कळंबोली ,तळोजा ,कामोठे , नवीन पनवेलचा समावेश
पनवेल : लढवय्या रोखठोक
पनवेल महानगरपालिकेच्या हद्दीत आज कोरोनाचे ५ नवीन रुग्ण आढळून आलेले आहेत.
यामध्ये तळोजा , कळंबोली , कामोठे व नवीन पनवेल शहरांचा समावेश आहे
तळोजा पाचनंद, सेक्टर-९, उमा पॅराडाईज बिल्डिंग येथील २८ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पोसिटीव्ह आलेली आहे.
सदर महिला वडाळा पोलिस स्टेशन येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. त्यांना कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
तसेच कामोठे, सेक्टर-३५, संकल्प सोसायटी येथील ५८ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पोसिटीव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती धारावी बेस्ट डेपो, मुंबई येथे वाहनचालक म्हणून कार्यरत आहे. हया व्यक्तीला कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
त्याच प्रमाणे कळंबोली, सेक्टर-४ ई, बिल्डिंग नं.९ येथील ५७ वर्षीय १ महिला कोविड-१९ पोसिटीव्ह आलेली आहे. ही महिला कॅन्सर आजारावर उपचार घेण्याकरीता टाटा हॉस्पीटल, मुंबई येथे गेली होती. सदर महिलेला टाटा हॉस्पीटलमध्येच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
कामोठे, सेक्टर-६. शितलधारा कॉम्प्लेक्स येथील ५२ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती वडाळा बेस्ट डेपो, मुंबई येथे इलेक्ट्रीक विभागामध्ये ड्रायव्हर आहे. सदर व्यक्तीला कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
तसेच नविन पनवेल सेक्टर-०४ पुष्पलता सोसायटी येथील ६५ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. वडाळा पोलिस स्टेशन येथे काम करीत असलेले पोलिस कर्मचारी व त्यांच्या कुटुंबातील सदस्य याआधी कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेले होते. त्यांच्या संपर्कात येऊनच या महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
तर पनवेल, देवगौरव बिल्डिंग येथील १ महिला याआधी कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आली होती. सदर महिला राजावाडी हॉस्पीटल येथे उपचार घेत होती. त्यांची कोव्हिड-१९ ची अंतिम चाचणी नेगेटिव आली असून ती पुर्णपणे बरी झाली आहे.
त्यांना आजरोजी घरी सोडण्यात आले आहे.