पनवेल ग्रामीण , उरण भागातील ३४ रुग्ण बरे : नव्या १६ रुग्णांची नोंद - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेल ग्रामीण , उरण भागातील ३४ रुग्ण बरे : नव्या १६ रुग्णांची नोंद

पनवेल ग्रामीण , उरण भागातील ३४ रुग्ण बरे : नव्या १६ रुग्णांची नोंद

उरण : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक

पनवेल ग्रामीण व उरण परिसरात आज कोरोनाचे १६ नवीन रुग्ण आढळून आलेले आहेत , तर उपचार घेत असलेल्या तब्बल ३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे .
  आजचे  पनवेल ग्रामीण व  उरण भागातील  रुग्णांची  संख्या पकडून  एकूण २६२  कोरोना रुग्णांची एकूण आकडेवारी झालेली आहे .
 आज नवीन सापडलेल्या रुग्णांमध्ये पाली देवद सुकापुर याठिकाणी ४ रुग्ण आढळले आहेत तसेच वाहाळ येथील १ रुग्ण पॉझिटिव्ह आढळलेली आहे .
  कसळखंड याठिकाणी २ रुग्ण आढळले असून आष्टे याठिकाणी १ रुग्ण आढळलेला आहे.
 त्याचप्रमाणे पळस्पे याठिकाणी १ रुग्ण आढळला आहे .
 चिखले येथील १ व्यक्ती आज कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे. त्याचप्रमाणे उलवे येथील १ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली आहे तसेच विचुंबे याठिकाणी २ ,
उरण येथील नवीन शेवा याठिकाणी १ रुग्ण , उरण करंजा याठिकाणी १,
 तसेच सुरकीचा पाडा याठिकाणी  २
 एकूण १६ व्यक्तींची आज पनवेल ग्रामीण  व उरण भागात नोंद झालेली आहे.

तर आज पनवेल ग्रामीण व उरण भागातील एकूण कोरोना उपचार घेत असलेल्या   तब्बल ३४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे .

 यामध्ये करंजाडे येथील ८ व्यक्ती,
उलवे याठिकाणी ऐकून ३ ,आकुर्ली येथील १, विचुंबे येथील २ ,
 उसरली येथील ३ व्यक्ती,
 पालीदेवद सुकापुर येथील १ व्यक्ती ,
उरण येथील करंजा या ठिकाणातील एकूण १५ व्यक्ती तर उरण सातघर द्रोनागिरी करंजा याठिकाणी  १ व्यक्ती अशा एकूण ३४ जणांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला


महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0