पनवेल कोरोनाचे २२ रुग्ण : दोन महिलांचा मृत्यू - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेल कोरोनाचे २२ रुग्ण : दोन महिलांचा मृत्यू
पनवेल कोरोनाचे २२ रुग्ण : दोन महिलांचा मृत्यू 

पनवेल : प्रतिनिधी 

लढवय्या रोखठोकपनवेल महानगरपालिका क्षेत्रातील कोरोना पॉझिटिव्ह रुग्णांची एकूण संख्या ४०० जवळ पोहचत आहे त्यामुळे शहरात आता चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे
आज पनवेल महानगरपालिका हद्दीतील कामोठे , नवीन पनवेल, कळंबोली, खारघर, पनवेल या भागात एकूण २२ कोरोना चे पॉझिटिव्ह रुग्ण आढळून आलेले असून यामध्ये  २ महिलांचा मृत्यू झालेला आहे .
आत्तापर्यंतचा पनवेल कोरोना चा आकडा ३९३ इतका झालेला आहे. आज सापडलेल्या रुग्णांमध्ये  सफाई कर्मचारी , परिचारिका पोलीस कर्मचारी ,   रेल्वे कर्मचारी  अशा व्यक्तींवर कोरोनाचा प्रादुर्भाव
  दिसून येत आहे.
  आज सापडलेल्या रुग्णांमध्ये
 *कामोठे* सेक्टर ३४ येथील संस्कृती सोसायटी याठिकाणी १ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेली आहे तसेच *कामोठे* सेक्टर ८ दीपक सोसायटी येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेल्या आहेत यातील एक व्यक्ती ती बँक कर्मचारी आहे त्याचप्रमाणे कामोठे सेक्टर ३४ मानसरोवर कॉम्प्लेक्स याठिकाणी एक महिला पॉझिटिव्ह आढळलेली आहे.
 *नवीन पनवेल* सेक्टर १४ येथील अमृत्वेल सोसायटी मध्ये १ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली आहे तसेच
*नवीन पनवेल* सेक्टर ४ सोसायटी याठिकाणी १ महिला पॉझिटिव्ह आलेली असून या मुंबई महानगरपालिकेत सफाई कर्मचारी आहेत
*नवीन पनवेल* ए टाइप इंद्रायणी सोसायटी याठिकाणी १ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेली आहे तसेच *नवीन पनवेल* सेक्टर १३ बी १० येथील १ महिला पॉझिटिव्ह आलेली आहे .
 *नवीन पनवेल* सेक्टर १५ अमरती सोसायटी या ठिकाणी १ व्यक्ती पॉझिटिव्ह आलेली आहे
  *खारघर* सेक्टर १५ प्रियदर्शनी सोसायटी या ठिकाणी एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेल्या आहेत या व्यक्तींच्या घरामध्ये एका व्यक्तीला याआधी लागण झालेली होती सदर व्यक्ती पोलीस अधिकारी आहे ,
 *खारघर* सेक्टर १२ या ठिकाणी एकाच कुटुंबातील ४ व्यक्ती पॉझिटिव आढळलेले आहेत त्याचप्रमाणे *खारघर* सेक्टर २१ एकलव्य सोसायटी या ठिकाणी एकाच कुटुंबातील २ व्यक्ती पॉझिटिव आढळलेले आहेत.
 *खारघर* सेक्टर १३ प्राईम रोज याठिकाणी १ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेली  आहे. सदर व्यक्ती चेंबूर येथे ते डॉक्टर असल्याची माहिती मिळत आहे
  *कळंबोली* रोडपाली सेक्टर २० रेवा अपार्टमेंट याठिकाणी १ महिला पॉझिटिव्ह आढळलेली आहे
 *पनवेल* साईनगर याठिकाणी १ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेली आहे  *पनवेल तक्का* येथील मोराज रेसिडेन्सी याठिकाणी १ महिला आढळलेली आहे तर तळोजा पेठ याठिकाणी १ महिला व नवीन पनवेल येथील १ महिला अशा एकूण २ रुग्णाचे निधन झालेले आहे.
   आज खारघर, कामोठे , कळंबोली येथील एकूण  ९ जणांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे .


महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0