वाढदिवसाचे पैसे सहाय्यता निधीला :
चिमुकल्या आदित्यची सामाजिक तळमळ
पनवेल : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक
पनवेल महानगरपालिकेचे सभागृहनेते परेश ठाकूर यांचे चिरंजीव
आदित्य परेश ठाकूर यांनी आपल्या वाढदिवसासाठी जमा केलेले पैसे थेट महापौर सहाय्यता निधीला देऊन सामाजिक बांधिलकी जोपासत उत्तमकार्य केलेलं आहे , त्याचे कौतुक सध्या सोशल मिडियावर सुरु आहे .
आपल्या ९ व्या वाढदिवसानिमित्त स्वत:च्या पिगी बँकमध्ये जमा झालेले २४७० रुपये पनवेल महापालिकेच्या महापौर सहाय्यता निधीत जमा करुन समाजाप्रती आपल्या भावना व्यक्त केल्या आहेत .
पनवेलचे माजी खासदार रामशेठ ठाकूर यांचा नातू असलेल्या आदित्यने केलेल्या या कार्यातून आजोबांप्रमाणेच दानशूर पणा दाखवत सामाजिक बांधिलकी जपली आहे .
करोना विषाणूचे थैमान दिवसेंदिवस रुद्र स्वरूप धारण करत आहे. पनवेल महापालिकेसह पनवेल तालुका सुद्धा रेड झोन मध्ये समाविष्ट झाला आहे. कोविड पॉझिटिव्ह रुग्णांचा आकडा हा दिवसेदिवस वाढत असून, कोविड योद्धे प्राणपणाने विषाणूंचा प्रादुर्भाव आटोक्यात आणण्यासाठी लढत आहेत. त्यापार्श्वभुमीवर पनवेल महापलिकेच्या महापौर डॉक्टर कविता चौतमोल आणि आयुक्त गणेश देशमुख यांनी ज्यांना मदत करायची आहे त्यांनी महापौर सहाय्यता निधी रक्कम जमा करावी असे आवाहन केले होते. या आवाहनाला अनेकांनी प्रतीसाद दिला असून, आदित्य परेश ठाकूर यांनी देखील वाढदिवसानिमीत्त स्वतःच्या पिगी बँकमध्ये जमा झालेले पैसे महापौर सहायत्ता निधीमध्ये जमा केले आहेत .