तळोजा एमआयडीसी आढळला दुसरा कोरोना रुग्ण
तळोजा : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक
तळोजा एमआयडीसी मध्ये आता अजून एक व्यक्ती कोरोना च्या विळख्यात सापडलेला आहे .
तळोजा येथील गंधारऑइल मिल याठिकाणी काम करत असलेला एका व्यक्तीला कोरोना ची लागण झालेली
ही व्यक्ती पालखुर्द येथील रहिवासी असून कामाच्या ठिकाणी त्याला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष वर्तविण्यात येत आहे.
तळोजा औद्योगिक वसाहतीतील ही ही दुसरी घटना असून कारखान्यामध्ये हा दुसरा रुग्ण आढळल्याने चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे
तळोजा या एमआयडीसीमधील दिवसेंदिवस एक एक करून कारखान्यांमध्ये ही कोरोना ची लागण होताना स्पष्ट दिसत आहे,
त्यामुळे सर्वांनीच योग्य ती काळजी घ्यावी असे प्रशासनाकडून वारंवार सांगण्यात येत आहे.