उरणकरांना दिलासा ३२ रूग्ण कोरोना मुक्त : नव्या एक रुग्णाची भर - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

उरणकरांना दिलासा ३२ रूग्ण कोरोना मुक्त : नव्या एक रुग्णाची भर

उरणकरांना दिलासा ३२ रूग्ण कोरोना मुक्त : 

नव्या एक रुग्णाची भर 


उरण : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक

  उरण तालुक्यातील आज समाधान कारक कोरोना चा आकडा समोर येत आहे .  कोरोनावर उपचार घेत असलेल्या तब्बल ३२ रुग्णांनी कोरोना वर मात केलेली आहे तर उरण परिसरातील बोरी येथील आज १ रुग्ण आढळलेला आहे
  उरण तालुक्यात गेल्या काही दिवसापासून कोरोना रुग्ण झपाट्याने वाढत होते त्यामुळे उरण परिसरात भीतीचे वातावरण व चिंता व्यक्त केली जात होती.
  उरण या ठिकाणी असलेल्या जेएनपीटी, मोरा , करंजा  या महत्वाच्या ठिकाणाहून मोठ्या प्रमाणात कोरोना चा संसर्ग वाढताना दिसत होता मात्र या वाढत्या आकड्यांवर आज कुठेतरी अंकुश मिळाल्याच समाधान  व्यक्त केले जात आहे.
 आज जे एन पी टी व कारंजा येथील एकूण ३२ रुग्ण कोरोना मुक्त झाल्याची माहिती प्राप्त झाल्या नंतर दिलासादायक बातमी समोर आलेली आहे.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0