संदीप पोखरकर यांचा मदतीचा हात : महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

संदीप पोखरकर यांचा मदतीचा हात : महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप

संदीप पोखरकर यांचा मदतीचा हात : महिलांना जीवनावश्यक वस्तूंचे वाटप


पनवेल  : लढवय्या रोखठोक

  तुर्भे केकेआर रोड येथील महिलाना संदीप पोखरकर यांच्या वतीने जीवनावश्यक वस्तूंचे वाटप केले आहे .
  २५० किलो तांदूळ, आणि १ हजार ४४० बिस्किट पुडे यांचे वाटप करण्यात आले आहे .
  कोरोनाच्या पार्श्‍वभूमीवरील संपुर्ण देशभरात लॉकडाऊन पुकारण्यात आले आहे. त्यातच मोठ्या प्रमाणात कोरोनाचे रुग्ण दिवसेंदिवस वाढताना दिसत आहेत. दिवसेंदिवस रुग्णांच्या संख्येत होणारी वाढत चिंताजनक असल्याने पुन्हा लॉक डाऊन वाढवण्यात येईल अशी शंका सर्वत्र व्यक्त केली जात आहे. या लॉकडाऊनमुळे अनेक महिलाचा छोटे मोठे लघु व्यवसाय पूर्णपणे बंद झालेले आहेत. त्यामुळे अशा गरजू व गरीब महिलाना आर्थिक अडचणींना सामोरे जावे लागत आहे. तुर्भे येथील गरीब व काम करणाऱ्या महिलाना संदीप पोखरकर यांच्या मार्फत २४० किलो तांदूळ, आणि १ हजार ४४० बिस्किट पुडे यांचे वाटप करण्यात आले. या मदतीबाबत सर्व महिलांनी त्यांचे आभार मानले आहेत. यावेळी पत्रकार मयूर तांबड़े आणि मोठ्या संख्येने महिला आणि प्रेरणा संस्थेच्या सदस्या उपस्थित होत्या.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0