उलवे , विचुंबे , उरण परिसरात कोरोनाचे ८ रुग्ण : चिमुरड्यांचा समावेश - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

उलवे , विचुंबे , उरण परिसरात कोरोनाचे ८ रुग्ण : चिमुरड्यांचा समावेश

उलवे , विचुंबे , उरण परिसरात कोरोनाचे ८ रुग्ण : चिमुरड्यांचा समावेश

उरण : प्रतिनिधी

   पनवेल ग्रामीण परिसरात देखील कोरोनाच्या महामारीने थैमान घातले असून आज या संपूर्ण भागात ८ कोरोना बाधितरुग्ण आढळले आहेत यामध्ये १ वर्षाच्या चिमुरडीचा तसेच ५ वर्षाच्या एका बालकाचा देखील समावेश आहे
 उलवे येथील प्लॉट नं. १९७, सेक्टर ३,  ३५ वर्षीय व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटीव्ह आली आहे.
 सदर व्यक्ती वाहतूक पोलीस विभागात कार्यरत आहे. सदर व्यक्ती कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. तसेच रिदधीसिदधी हौसिंग सोसायटी, सेक्टर ८, उलवे येथील ३१ वर्षीय महिला आणि त्यांची दोन लहान मुले मुलगा ५ वर्ष, मुलगी १ वर्ष, कोव्हिड -१९ पॉझिटीव्ह आली आहे.
 सदरच्या तीनही व्यक्ती एकाच कुटुंबातील असून कुटुंब प्रमुख सदर महिलेचे पती हे याआधी कोव्हिड -१९ पॉझिटीव्ह आलेले आहेत. सदर महिलेला व त्यांच्या मुलांना त्यांच्या पतीपासून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
तसेच आज ओमकार पार्क, विचुंबे येथील २६ वर्षीय महिला, २५ वर्षीय महिला, ३५ वर्षीय पुरुष, कोव्हिड -१९ पॉझिटीव्ह आलेले आहेत. सदरच्या तीनही व्यक्ती एकाच कुटुंबातील असून कुटुंबातील एक सदस्य हे याआधी कोव्हिड -१९ पॉझिटीव्ह आलेले आहेत. सदर दोन्ही महिला व एक पुरुष यांना त्यांच्या कुटुंबातील सदस्याकडून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
  मोरा, उरण येथील ११ वर्षीय मुलगी कोव्हिड -१९ पॉझिटीव्ह आलेली असून सदर मुलीचे आईवडील याआधी कोव्हिड१९ पॉझिटीव्ह आलेले आहेत. त्यांच्या पासून तिला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0