निराधारांसाठी रामदास शेवाळे प्रतिष्ठांची सामाजिक बांधिलकी
अपंग , विधवा महिला, निराधार लोकांना धान्याचे वाटप
कळंबोली : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक
गेल्या दीड महिन्यापासून सुरू असलेल्या लॉकडाऊन मूळे अनेक घटकातील लोकांना आपला उदरनिर्वाहकसा करायचीयाची चिंता भेडसावत आहे त्यामध्ये शारीरिकदृष्ट्या अपंग , निराधार महिला , जेष्ठ नागरिक अनेक हातावर पोट असणाऱ्या कुटूंनाची आता परिस्थितीबेताची होत चाललेली आहे .
अशामध्ये अनेक स्थरावरून दानशूर हात जमेल तशी मदत करत आले आहेत त्यातच कळंबोलीतील रामदास शेवाळे प्रतिष्ठान यांच्यावतीने असाच सामाजिक उपक्रमहाती घेण्यात आला आहे .
लॉकडाउनमुळे अनेकांच्या घरात आर्थिक महामंदी शिरली आहे. त्यामुळे विदारक परिस्थिती निर्माण झाली आहे.
रामदास शेवाळे प्रतिष्ठानच्या माध्यमातून तांदूळ, गव्हाचे पीठ, कांदे, बटाटे या शिवाय इतर जीवनावश्यक वस्तू वाटपाचा संकल्प करण्यात आला. आणि या उपक्रमाला सुरुवात सुद्धा झाली आहे. त्यासाठी प्रतिष्ठानच्या माध्यमातून रामदास शेवाळे यांनी ६ टन जीवनावश्यक वस्तू खरेदी केल्या आहेत. त्यांचे किट सुद्धा बनवण्यात आले आहेत. या माध्यमातून शुक्रवारपासून वाटप सुरू करण्यात आले आहे . तसेच अतिशय हलाखीची परिस्थिती असणाऱ्यांना सुद्धा यावस्तू देण्यात येणार असल्याची माहिती रामदास शेवाळे यांनी दिली . सामाजिक अंतर ठेवून आम्ही हा उपक्रम राबवत आहोत. गरजवंताच्या घरी हे धान्याचे किट पोचवले जात आहे. त्यामुळे गर्दी होण्याचा प्रश्नच येत नाही. हे वाटप करताना सॅनिटायझर , मास्क वापरले जातात. कोरोना विषाणूंचे संक्रमण होणार नाही. याची पुरेपूर खबरदारी घेऊन माणुसकीचा हात देण्याचा आमचा हा छोटासा प्रयत्न असल्याचे देखील ते म्हणाले . तसेच १० दिवस या जीवनावश्यक वस्तूंचे वाटप करण्यात येणार असल्याची माहिती प्रतिष्ठानने दिली आहे .