पनवेल ग्रामीण व उरण भागात ८ कोरोना रुग्ण तर एकूण ३० रुग्णना डिस्चार्ज - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेल ग्रामीण व उरण भागात ८ कोरोना रुग्ण तर एकूण ३० रुग्णना डिस्चार्ज

पनवेल ग्रामीण व उरण भागात ८ कोरोना रुग्ण तर एकूण ३० रुग्णना डिस्चार्ज
पनवेल : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोकपनवेल ग्रामीण  व उरण परिसरात आज कोरोनाचे चे एकूण ८ नवे रुग्ण आढळून आलेले आहेत.
  त्यामध्ये उरण परिसरात एकूण २ रुग्ण तर पनवेल ग्रामीण भागात एकूण ६ रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे.
 आनंदाची गोष्ट म्हणजे पनवेल ग्रामीण व उरण भागातील एकूण ३० रुग्ण पूर्णतः बरे झालेले आहेत.
  आज सापडलेल्या रुग्णांमध्ये चिपळे येथील ५२ वर्षे एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव आलेली आहे .
 तसेच विचुंबे याठिकाणी ३३ वर्षीय एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली आहे.
 कसळखंड येथील ३० वर्ष एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली आहे त्याचप्रमाणे पाली देवद सुकापुर याठिकाणी २९ वर्षे एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली आहे., नेरे याठिकाणी मारीगोल्ड सिटी येथील ३० वर्षे एक व्यक्ती पॉझिटिव्ह आलेली आहे तसेच पाली देवद सुकापुर येथील अजून  एक ५२ वर्ष व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली आहे तर उरण करंजा याठिकाणी ४३ वर्षे एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या आहे तसेच नागाव याठिकाणी ५९ वर्षे एक व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली आहे.   तर उलवे, करंजाडे ,  पाली देवद सुकापुर, कोण , उमरोली व उरण परिसरातील करंजा याठिकाणी  एकूण ३०  कोरोना बाधित रुग्णांना आज रुग्णालयातून डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0