गावठी दारूची हातभट्टी छापा टाकून नष्ट
पनवेल पोलिसांची कारवाई
पनवेल / दत्तात्रेय कोळी
लढवय्या रोखठोक
पाडेघर गावाच्या हद्दीतील जेडब्लूआर गोडाऊनजवळील झोपडपट्टीत शासनाच्या आदेशाचा भंग करून गावठी दारूची हातभट्टी लावण्यात येत असल्याची माहिती वरिष्ठ पोलिस निरीक्षक अजयकुमार लांडगे यांना मिळाली. त्यांच्या मार्गदर्शनाखाली सहा.पो.नि. निलेश राजपूत, पो.उपनि. विश्वासराव बाबर, पो.ना. बिन्नर, पो.शि. आव्हाड, महिला पो.शि. भाग्यश्री भोईर आदींच्या पथकाने सदर ठिकाणी छापा टाकून चुलीवर गावठी हातभट्टी तयार करीत असताना एक इसम मदन गोवारे (वय-50) याच्यासह प्रतिभा गोवारी (वय-45), श्रीमती मनप्पा मेघावत (वय-30), श्रीमती कविता चव्हाण (वय-30), श्रीमती ललिता चव्हाण (वय-25) यांना ताब्यात घेऊन त्यांच्याविरूद्ध भादवी कलम 188, 270, 271 सह महाराष्ट्र दारुबंदी कायदा कलम 65 (ई) सह आपत्ती व्यवस्थापन अधि.205 चे कलम 51 (ब) सह साथीचे रोग अधि.1897 चे कलम 3 अन्वये पनवेल शहर पोलीस ठाण्यात गुन्हा दाखल केला आहे. सदर गुन्ह्यात 58, 125 रू. किंमतीचे कच्चे रसायन, प्लॅस्टिक ड्रम, प्लॅस्टिक कॅन व इतर साहित्य जागीच नष्ट करण्यात आले आहे. तर साडे 14 हजार रूपये किंमतीची 15 लिटर गावठी दारू 3 मोबाईल फोन व इतर वस्तू हस्तगत करण्यात आले आहेत.