थायरॉकेअर पॅथॉलॉजीला महापालिकेचा दणका ; कोविड_१९ रिपोर्टमध्ये तफावत असल्याचा ठपका . - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

थायरॉकेअर पॅथॉलॉजीला महापालिकेचा दणका ; कोविड_१९ रिपोर्टमध्ये तफावत असल्याचा ठपका .

थायरॉकेअर पॅथॉलॉजीला महापालिकेचा दणका 

  कोविड_१९ रिपोर्टमध्ये तफावत असल्याचा ठपका .

पनवेल : प्रतिनिधी

लढवय्या रोखठोक




   पनवेल महानगरपालिकेने तुर्भे येथील नामांकित थायरोकेयर या पॅथॉलॉजी लॅब ला यापुढे पनवेल महानगरपालिका हद्दीतून  कोणतेही कोविड१९ तपासण्या किंवा संशयित करोना रुग्णाचे स्लॅब घेऊ नयेत असे आदेश दिल्याने पनवेल परिसरात एकच खळबळ उडाली आहे .
  पनवेल महानगरपालिकेच्या माहितीनुसार या थायरॉकेअर लॅब च्या माध्यमातून घेण्यात आलेल्या कोविड१९ तपासण्या या लॅबच्या माध्यमातून  पॉझिटिव निष्पन्न झाल्यानंतर पनवेल परिसरात काही प्रकरणात हे रिपोर्ट  दुसऱ्यांदा यांची कोविड१९ टेस्ट निगेटिव्ह आल्याचे निष्पन्न झाल्याने महापालिकेने संबंधित लॅबला यापुढे कोणत्याही रुग्णाचे स्वॅब घेऊ नये असे आदेश दिलेले आहेत. सध्या याबाबतचे पत्र सोशल मीडियावर व्हायरल होत असून पनवेल सह अजून कोण कोणत्या शहरांमध्ये थायरोकेयर लॅब च्या माध्यमातून कोविंड१९ च्या तपासण्या केल्या जात आहेत व त्या ठिकाणी देखील असाच काहीसा गोंधळ झाल्याची शक्यता आहे .
  सध्या परिसरात पनवेल , नवीमुंबई , ठाणे , मुंबई  सह दिवसागणिक झपाटयाने कोरोना चे रुग्ण आढळून आल्याचे वृत्त समोर येत आहे मात्र अशा प्रकारच्या संशयित पॉझिटिव्ह येणाऱ्या तपासण्यामुळे शहरातील नेमकी कोरोना रुग्णांची आकडेवारी किती हे मात्र सांगणे अवघड आहे या सर्व प्रकारानंतर  अशा चुकीच्या रिपोर्ट येण्याबाबत शासनाने योग्य अशी पावले उचलून दोषींवर कारवाई करणे अपेक्षित आहे.


महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0