एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह : विक्रांत पाटील यांचा अभिनव उपक्रम - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह : विक्रांत पाटील यांचा अभिनव उपक्रम

 विक्रांत पाटील यांचा अभिनव उपक्रम
एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह : जीवनावश्यक हेल्पलाईन

पनवेल : संजय कदम
लढवय्या रोखठोक
    पनवेल महानगरपालिकेचे मा. उपमहापौर व प्रभाग क्र - १८ चे नगरसेवक विक्रांत बाळासाहेब पाटील यांनी सध्याच्या कोरोनामुळे उद्भवलेल्या लॉकडाऊनच्या संकट काळात प्रभागातील नागरिकांसाठी " एक कॉल प्रॉब्लेम सॉल्व्ह "
 हा उपक्रम सुरू केला असून याचा फायदा शेकडो नागरिकांनी घेतला असून त्यांचे अशा वेगवेगळ्या प्रकारे नियमितपणे सामाजिक बांधिलकीचे उपक्रम राबवित असल्याबद्दल कौतुक होत आहे.
              प्रभागातील सर्व सामान्य नागरिकांप्रमाणे निराधार माता भगिनी, ज्येष्ठ नागरिक, दिव्यांग बांधव यांना आता सध्याच्या काळात जीवनावश्यक वस्तू खरेदी करण्यासाठी बाहेर पडणे म्हणजे धोकादायकच आहे. अशा व्यक्तींना घराबाहेर पडण्यास लागू नये व त्यांना आवश्यक असलेल्या जीवनावश्यक वस्तू घरच्या घरी मिळाव्यात यासाठी  नगरसेवक विक्रांत पाटील यांनी भ्रमणध्वनी-९१६७०४२६६६ वर कॉल करा अथवा व्हॉट्सअप मेसेज द्वारा आपली आवश्यक समस्या त्यांच्या पर्यंत पोहचवा. सदर समस्या ते त्यांच्या प्रतिनिधींमार्फत घरपोच सेवा पोहोचविण्याचा प्रामाणिक प्रयत्न करतील. यात प्रामुख्याने गॅस सिलेंडर सेवा, औषधे, मेडिकल सामग्री, भाजीपाला, किराणा सामान व इतर जीवनावश्यक सेवा आदी गोष्टी घरपोच करण्यात येईल. हा उपक्र्म सुरू केल्यापासून मोठ्या प्रमाणात नागरिकांनी याचा फायदा घेतला आहे व आगळ्यावेगळ्या उपक्रमाबद्दल नगरसेवक विक्रांत पाटील यांचे सर्वच स्तरातून कौतुक होत आहे.
         

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0