नवीमुंबई पोलिसांची कारवाई बेकायदेशीर दारु व २ किलो गांजा जप्त - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

नवीमुंबई पोलिसांची कारवाई बेकायदेशीर दारु व २ किलो गांजा जप्त

  नवीमुंबई पोलिसांची कारवाई
 बेकायदेशीर दारु व २ किलो गांजा जप्त
तळोजा : प्रतिनिधी

  महाराष्ट्र राज्यात कोरोना (कोविड-१९) या विषाणूने
 आजारी पडलेल्या रूग्णांच्या संख्येत दिवसेंदिवस वाढ होत आहे. त्यासंबंधाने केंद्र व राज्य शासनाने वेळोवेळी सदर विषाणूंचा संसर्ग व प्रादुर्भाव होवू नये म्हणून साथीचा आजार अधिनियम १८९७, आपत्ती व्यवस्थापन अधिनियम २००५ च्या इतर सर्व संबधीत तरतुदींसह संपूर्ण देशात लॉक डाउन जाहीर केलेला आहे. लॉक डाऊन दरम्यान मद्य विक्री होवू नये यासाठी मा.पोलीस आयुक्त, नवी मुंबई, पोलीस सह आयुक्त,नवी मुंबई यांनी दिलेल्या सुचनेप्रमाणे प्रविणकुमार पाटील, पोलीस उप आयुक्त गुन्हेशाखा, विनोद चव्हाण, सहा.पोलीस आयुक्त, गुन्हेशाखा व सर्व कक्षाचे अधिकारी/कर्मचारी यांनी अदयापोवतो नवी मुंबई हद्दीमध्ये ७ ठिकाणी छापे टाकुन बेकायदेशीर दारु जप्त करुन आरोपींना अटक केलेली आहे. ४,९१,१६७ /- रूपये किमतीचे
  दिनांक ०६/०५/२०२० रोजी अमली पदार्थ विरोधी पथकाने तळोजा पोलीस ठाणेच्या हद्दीत छापा घालून आरोपी रमजानहुसेन अब्दुलजलील खान , वय -२६ वर्षे ,मु.पो पाले खुर्द ,पोस्ट - देवीचा पाडा,ता - पनवेल, जि-रायगड, मुळ रा - मु.पो --दांसिंग दुरारा पोस्ट
 दुरारे ठाणा तालुका : बस्ती जि : संत कबीर नगर ,राज्य उत्तर प्रदेश यास अटक करुन त्यांच्याकडुन २ किलो २० ग्रॅम वजनाचा "गांजा जप्त करुन कारवाई केलेले आहे.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0