पनवेलकरांच्या हाकेला बृहन्मुंबई महानगरपालिकेची साथ : आ.प्रशांत ठाकूरांनी व्यक्तकेले आभार - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेलकरांच्या हाकेला बृहन्मुंबई महानगरपालिकेची साथ : आ.प्रशांत ठाकूरांनी व्यक्तकेले आभार

पनवेलकरांच्या हाकेला बृहन्मुंबई महानगरपालिकेची साथ : 

   आ.प्रशांत ठाकूरांनी व्यक्तकेले आभार 


पनवेल : लढवय्या रोखठोक



  पनवेल महानगरपालिका हद्दीतून मुंबई शहरात ये_जा करणाऱ्या डॉक्टर , आरोग्य कर्मचारी , सफाई कर्मचारी व इतर कामगार यांच्या राहण्याची व्यवस्था कॊरोना निवारण होण्यापर्यंत बृहन्मुंबई महानगरपालिकेने मुंबईतच करावी जेणे करून पनवेल मधील कोरोनाचा आकडा नियंत्रणात येईल या पनवेलकारांच्या मागणीनंतर पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी ही मागणी पूर्ण होण्यासाठी शासनाकडे मागणी करून पनवेल बंदचा इशारा दिला होता  याबाबत योग्य निर्णय घ्यावा अन्यथा नाईलाजास्तव ४ मे रोजी पनवेल परिसर अत्यावश्यक सेवा वगळून कडकडीत बंद ठेवण्याचा इशारा पनवेलचे आमदार प्रशांत ठाकूर यांनी दिला होता .
  या जिव्हाळ्याच्या प्रश्नाबाबत बृहन्मुंबई महानगरपालिकेने सकारात्मक भूमिका घेऊन पनवेल तालुक्यातून मुंबई या ठिकाणी कामासाठी ये-जा करणाऱ्या कर्मचाऱ्यांच्या राहण्याची सोय मुंबईतच करणार असल्याचा निर्णय घेतल्याने दिलासा पनवेल करांना मिळाला आहे व ४ मे रोजीचा बंद आता  मागे घेण्याचा निर्णय प्रशांत ठाकूर यांनी घेतला आहे .
 बृहन्मुंबई महानगरपालिकेने ज्याप्रकारे आपल्या कर्मचाऱ्यांची राहण्याची संपूर्ण व्यवस्था मुंबई येथे करण्याचे ठरवले आहे त्याच प्रकारे पनवेल तालुक्यातून मुंबई या ठिकाणी कार्यरत असणाऱ्या पोलीस बांधवांचे देखील अशाप्रकारे व्यवस्था मुंबईच्या पोलीस आयुक्त व प्रशासनाच्या सकारात्मक विचाराने करावी अशी विनंती यांनी केली आहे .
   डॉक्टर  ,  सफाई कामगार , आरोग्य कर्मचारी यांच्या राहण्याचे संपूर्ण व्यवस्था मुंबई मध्येच आता केली जाणार आहे त्यामुळे  पनवेल महानगरपालिकेत कोरोना बाधितांचा झपाट्याने वाढणारा आकडा नियंत्रणात येण्यासाठी मदत होईल असाविश्‍वा व्यक्त केला जाऊ लागला आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0