नवीमुंबईत ४५ कोरोना रुग्ण आढळले : कोरोना आकडा ४४०
नवीमुंबई : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक
नवी मुंबई महानगरपालिका परिसरात आज ४५ कोरोना बाधित रुग्ण आढळून आलेले आहे त्यामुळे नवी मुंबई महानगरपालिका हद्दीतील कोरोना बाधित रुग्णांची एकूण संख्या ४४० इतकी झालेली आहे.
नवी मुंबई परिसरात कोरोना बाधित यांची संख्या झपाट्याने वाढत आहे नवी मुंबई महानगरपालिका यांच्या वतीने वेळोवेळी याबाबत उपाययोजना करून देखील ही संख्या आटोक्यात येत नसल्याने परिसरात धक्कादायक परिस्थिती निर्माण होत चाललेले आहे त्यामुळे नागरिकांना मोठी चिंता सतावत आहे.
नवी मुंबई शहरात कोरोनाचा फैलाव झपाट्याने होत असून ४४० रुग्णांपैकी ३४० रुग्ण मागील दहा दिवसात वाढले आहेत.
त्यात एपीएमसी मार्केट मध्ये कोरोना बाधीत रूग्ण मोठ्या प्रमाणात आढळुन येण्यास सुरवात झाली असून व्यापारी आणी त्यांच्या संपर्कात आलेले असे एकूण कोरोना बाधीत वाढत आहेत एपीएमसी मध्ये आणखीन २३ रुग्णांची भर पडली आहे. एपीएमसी बाजारपेठ ही सर्वात मोठी बाजारपेठ त्यामुळे या ठिकाणी दररोज हजारोंच्या घरात नागरिक , वाहनांची वर्दळ असते. त्यामुळे याठिकाणी कोरोनाचा संसर्ग आणखीन पसरत आहे. त्यामुळे व्यापारी व नवी मुंबई नागरिक एपीएमसी बंद सेव नवी मुंबई सोशल मीडियावर अशी मोहीम राबवित आहेत.