पनवेल मध्ये ६ कोरोना रुग्ण आढळले ; तर २ रुग्ण बरे - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेल मध्ये ६ कोरोना रुग्ण आढळले ; तर २ रुग्ण बरे

पनवेल मध्ये ६ कोरोना रुग्ण आढळले

  •   तर २ रुग्ण बरे 

पनवेल : प्रतिनिधी 

 लढवय्या रोखठोक


पनवेल महानगरपालिका हद्दीत आज कॊरोनाचे  ६ रुग्ण आढळून आले आहेत तर २  रुग्ण बरे झाल्याची माहिती प्रशासनाने दिली आहे .
   आज आढळलेल्या रुग्ण हे
  खारघर  ,कामोठे शहरातील आहेत .
   खारघर, सेक्टर-१०. कोपरा गाव येथील ४१ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पोसिटीव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती APMC मार्केट, वाशी येथे टेम्पो ड्रायव्हर म्हणून कार्यरत आहे. त्यांना कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
  खारघर, सेक्टर-३५ई, जायनो सोसायटी येथील ४६ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिलेचे पती व मुलगा याआधी कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांच्यापासूनच या महिलेला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
 कामोठे, सेक्टर-१४, मिराप्रभु निवास येथील ४६ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती बेस्ट डेपो.
 गोवंडी येथे बस चालक म्हणून कार्यरत आहे. त्यांना कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
 कामोठे, सेक्टर-२४, स्कायगोल्ड अपार्टमेंट येथील ३५ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती वडाळा पोलिस स्टेशन, मुंबई येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत आहे. सदर व्यक्तीला कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.तसेच
खारघर सेक्टर-१३ बालाजी हाईट्स येथील ४२ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती डायलिसीस करीता सुरज हॉस्पीटल, सानपाडा येथे जात होती. सदर व्यक्तीला हॉस्पीटलमधूनच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
  कामोठे सेक्टर-१८ सिल्वर पार्क सोसायटी येथील ५८ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेली आहे. ही व्यक्ती APMC मार्केट, वाशी येथे असिस्टंट म्हणून कार्यरत आहे. हया व्यक्तीचा कार्यालय प्रमुख याआधी काव्हिड-१९ पॉझिटिव्ह आला होता. त्यांच्या संपर्कात येऊनच हया व्यक्तीला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
  तर  नावडे, खिडुकपाडा येथील ५९ वर्षीय १ महिला याआधी कोविड-१९ पॉझिटिव आली होती. सदर महिलेची कोव्हिड-१९ ची अंतिम चाचणी नेगेटिव्ह आली असून ती पुर्णपणे बरी झाली आहे. त्यांना आजरोजी घरी सोडण्यात आले आहे. तसेच कामोठे सेक्टर-३४ येथील ६२ वर्षीय १ व्यक्ती याआधी कोव्हिड १९ पॉझिटिव्ह आली होती. सदर व्यक्तीची कोव्हिड-१९ ची अंतिम चाचणी नेगेटिव्ह आली असून ती पुर्णपणे बरी झाली आहे. त्यांना आजरोजी घरी सोडण्यात आले आहे.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0