पनवेलमध्ये कोरोनाला ब्रेक :१७ रुग्णांना डिस्चार्ज
रोहिंजन , नावडे , कळंबोली , कामोठ्यात ८ रुग्ण आढळले
पनवेल : प्रतिनिधीलढवय्या रोखठोक
पनवेल महानगर पालिका हद्दीत दिवसेन दिवस कोरोनाच्या पोसिटीव्ह रुग्णांमध्ये झपाट्याने वाढ होताना दिसत होती मात्र आज सकरात्मक निकाल पहावयास मिळत आहे
आज ८ नवीन रुग्णांची नोंद झालेली असून १७ रुग्ण बरे होऊन घरी गेले आहेत .
तळोजा हद्दीत कोरोनाचा शिरकाव होत आहे आज नावडे , ओवे नंतर रोहिंजन कडे कोरोना पोहचला आहे .
आज सापडलेल्या रुग्णांमध्ये
कामोठे , नावडे , रोहिंजन , कळंबोली व नवीन पनवेलचा समावेश आहे .
कामोठे येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती पोसिटीव्ह आढळले आहेत .
नावडे फेज २ येथील देवदृष्टी येथे १ रुग्ण पोसिटीव्ह आढळला आहे .
कळंबोली सेक्टर ३ के एल ६ येथील १ रुग्ण आज पोसिटीव्ह या आढळला आहे .
नवीन पनवेल सेक्टर २ याठिकाणी १ तर रोहिंजन न्यु कॉलनी साठे निवास या ठिकाणी १ कोरोना पोसिटीव्ह आढळला आहे .
नवीन पनवेल इंद्रायणी सोसायटी याठिकाणी एकाच कुटुंबातील २ व्यक्ती पोसिटीव्ह आढळले असून एकूण ८ रुग्ण आढळले आहेत .
तर कामोठे , खारघर ,कळंबोली , पनवेल भागातील १७ रुग्णना डिस्चार्ज देण्यात आला आहे .