पनवेलमध्ये कोरोनाचे २४ रुग्ण ; तर ९ रुग्ण बरे - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेलमध्ये कोरोनाचे २४ रुग्ण ; तर ९ रुग्ण बरे

पनवेलमध्ये कोरोनाचे २४ रुग्ण

 तर ९ रुग्ण बरे


पनवेल : प्रतिनिधी

लढवय्या रोखठोक



पनवेल महानगरपालिका हद्दीत आज कोरोना चे तब्बल २४ रुग्ण आढळून आलेले आहेत यामध्ये
कामोठे  ,खारघर , खांदाकॉलोनी , कळंबोली शहरांचा समावेश आहे तर  ९  रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत.
  कामोठे, सेक्टर-३५, संकल्प सोसायटी येथील एकाच कुटुंबातील ४५ वर्षीय व ११ वर्षीय अशा २ महिला कोकिड-१९ पोसिटीव्ह आलेल्या आहेत. सदरपैकी एक महिला मुंबई महानगरपालिका येथे लिपिक म्हणून कार्यरत आहे. त्या महिलेला कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाला असून तिच्या मुलीला तिच्यापासूनच संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे. तसेच
कामोठे, सेक्टर-११. आशियाना कॉम्प्लेक्स येथील एकाच कुटुंबातील २७ वर्षीय व २५ वर्षीय अशा २ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. सदर कुटुंबाचा कुटुंब प्रमुख याआधी कोव्हिड-१९ पोसिटीव्ह आलेला होता. त्यांच्यापासूनच या दोघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
त्याच प्रमाणे खांदाकॉलनी, सेक्टर-७, श्रीजी संघ सोसायटी येथील एकाच कुटंबातील ४ व्यक्ती कॉव्हिड-१९ पोसिटीव्ह आलेल्या आहेत.
  सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुख याआधीच कोव्हिड-१९ पोसिटीव्ह आलेली होती. त्यांच्यापासूनच या चौघांना संसर्ग झाल्याचा अतिम निष्कर्ष आहे.
  खांदा कॉलनी, सेक्टर-७, सागरदीप सोसायटी येथील एकाच कुटुंबातील ४ व्यक्ती कोव्डि-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत. सदर व्यक्तीचे नातेवाईक खांदा कॉलनी, सेक्टर-७. श्रीजी संघ सोसायटी येथे राहत असून ते याआधीच कोव्हिड-१९ पोसिटीव्ह आलेले आहेत. त्यांच्यापासूनच या चौघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
  कळंबोली, सेक्टर-३ई. केएल ५ येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोव्हिड-१९ पाझिटिव्ह आलेल्या आहेत. सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुख मुंबईयेथे बेस्ट कंडक्टर असून ते याआधीच कोविड-१९ पोसिटीव्ह आलेले आहेत. त्यांच्यापासूनच या दोघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
  खारघर, सेक्टर-१५, वास्तुविहार सोसायटी येथील १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती गोवंडी डेपो येथे बेस्ट कन्डक्टर म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
  खारघर, सेक्टर-११, फ्रेड सोसायटी येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोविड-१९ पोसिटीव्ह आलेल्या आहेत. सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुख चेंबूर येथे पोलीस उपनिरीक्षक म्हणून कार्यरत असून याआधीच कोविड-१९ पोसिटीव्ह आलेले आहेत. त्यांच्यापासूनच या दोघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
त्याच प्रमाणे कामोठे, सेक्टर-५, मारूती टॉवर येथील व्यक्ती कोविड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती नागपाडा पोलिस स्टेशन, मुंबई येथे पोलिस कॉन्सटेबल म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
  रोडपाली, सेक्टर-१०, कुबेर पॅलेस येथील एकाच कुटुंबातील ४ व्यक्ती कोव्हिड-१९ पाझिटिव्ह आलेल्या आहेत. सदर कुटुंबातील कुटुंब प्रमुख चेबूर येथे पोलीस उपनिरीक्षक  म्हणून कार्यरत असून याआधीच कोकिड-१९ पॉझिटिव्ह आलेले आहेत.
त्यांच्यापासूनच या चौघांना संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
  कळंबोली, सेक्टर-३ई. के एल ५ येथील ३३ वर्षाय १ महिला कोव्हिङ-१९ पोसिटीव्ह आलेलो आहे. सदर महिलेच्या शेजारच्या घरातील एक व्यक्ती गोवंडी बस डेपो येवे कंडक्टर म्हणून कार्यरत असून याअगोदरच ते  कोव्हिड- १९ पाझिटिव्ह आलेले आहेत. त्यांच्यापासूनच सदर महिलेला संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
कामोठे, सेक्टर-१७. रिद्धी सिध्दी दर्शन येथील ३६ वर्षीय १ व्यक्ती कोकिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती शिवाजी नगर पोलिस ठाणे, गोवंडी येथे पोलिस दलात कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राचमिक निष्कर्ष आहे.
  *तर आज ०९ रूग्ण*
  कामोठे येथील एकूण ५ व्यक्तीची कोव्हिड-१९ ची अंतिम चाचणी निगेटिव्ह आली असून ते पूर्णपणे बरे झाले आहेत. त्या सर्वाना आजरोजी घरी सोडण्यात आले आहे.
  नविन पनवेल येथील एकूण २ व्यक्तींची कोव्हिड-१९ वी अंतिम चाचणी निगेटिव्ह आली असून ते पुर्णपणे बरे झले आहेत.
त्या सर्वाना आज घरी सोडण्यात आले आहे.
खारघर येथील एकूण २ व्यक्तीची कोव्हिड-१९ ची अंतिम चाचणी निगेटिव्ह आली असून ते पुर्णपणे बरे झाले आहेत. त्या सर्वाना आजरोजी घरी सोडण्यात आले आहे.


महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0