पनवेलमध्ये ठाकरे सरकार विरोधात निदर्शने - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेलमध्ये ठाकरे सरकार विरोधात निदर्शने

पनवेलमध्ये भाजपाची ठाकरे   सरकार विरोधात निदर्शने 

  पनवेल (प्रतिनिधी)
लढवय्या रोखठोक

   राज्यातील महाआघाडीचे ठाकरे सरकार कोरोना नियंत्रणाच्या नियोजनात सपशेल फेल ठरले असून जनता व्हेंटिलेटरवर असताना मुख्यमंत्र्यांनी स्वतःला विलगिकरण केले आहे .
   अशी सडकून टिका भाजपा उत्तर रायगड जिल्हा अध्यक्ष प्रशांत ठाकूर यांनी केली आहे .
  सरकार विरोधात पनवेल भाजपा कार्यालयाबाहेर केलेल्या आंदोलनात ते बोलत होते . 
   कोरोना विषाणू प्रादुर्भाव नियंत्रणामध्ये पूर्णपणे अपयशी ठरलेल्या महाविकास आघाडी ठाकरे सरकारला जाब विचारण्यासाठी उत्तर रायगड भाजप आणि पनवेल तालुका व शहर भाजपच्यावतीने पक्ष कार्यालय येथे 'महाराष्ट्र बचाव' आंदोलन करण्यात आले.
  महाराष्ट्र वाचवा महाराष्ट्र वाचवा, कोरोना रोखण्यात निष्फळ ठरलेल्या उद्धव ठाकरे सरकारचा धिक्कार असो  अशा घोषणा देत सरकारचा कडाडून विरोध यावेळी करण्यात आला .
  कोरोना योद्धा लढतात या योद्धांच्या पाठीशी ठामपणे उभे राहण्याच्या ऐवजी कोरोना योद्धा आणि त्यांच्या कुटुंबाकडे हे सरकार दुर्लक्ष करीत असल्याचा आरोपही त्यांनी यावेळी करण्यात आला .
   लॉकडॉउन मध्ये राज्यात पोलिसांवर जीवघेणे हल्ले होत आहेत, पोलीस, डॉक्टर, नर्स आदी कोरोना योद्धे यांच्या जीवावर बेतत आहे .
  मात्र ठाकरे सरकार अद्यापही निद्रास्त असून सरकार म्हणून काम करण्याची गरज असतानाच मुख्यमंत्री उद्धव ठाकरे घरातून आदेश देत आहेत मात्र विधानपरिषदेची उमेदवारी अर्ज कुटुंबासह गर्दीने कसे दाखल करतात, असा सवालही आमदार प्रशांत ठाकूर यांनी उपस्थित करत महाविकास आघाडी सरकारचा निषेध व्यक्त केला.
    ताळमेळ नसलेल्या राज्यातील महाविकास आघाडी सरकारच्या निष्क्रिय कारभारामुळे कोरोनाच्या पार्श्वभूमीवर प्रशासकीय आणि शासकीय यंत्रणेत कुठलाच ताळमेळ दिसत नाही.
  राज्यात कोरोनाग्रस्त रुग्णांची संख्या दिवसेंदिवस झपाट्याने वाढत आहे तर हजारो कोरोना बाधित रुग्णांचा मृत्यू देखील झालेला असताना  ठाकरे सरकारला याचे गांभीर्य असल्याचे दिसत नाही. असे ही ठाकूर म्हणाले
 मुंबईत रुग्णालयांमध्ये बेड, रुग्णवाहिका उपलब्ध नाहीत, दोन-दोन दिवस रुग्ण उपचारासाठी तडफडत आहेत. हा गलथान कारभार वारेमापपणे ठाकरे सरकार मुकाटपणे बघत आहे. देशात अनेक राज्य हळू हळू पूर्व पदावर येत असताना महाराष्ट्रावर मात्र कोरोनाचे संकट वाढत आहे. लॉकडॉउन फक्त नावाला दिसत आहे.  देशात कोरोनाच्या एकूण संख्येपैकी ३० टक्के रुग्ण हे महाराष्ट्रातील आहेत. तर २४ टक्के रुग्ण एकट्या मुंबईतील आहेत. तरीही ठाकरे सरकार हातावर हात धरून बसलेल आहे, असा आरोप आ. ठाकूर यांनी केला.        कोरोनाच्या पार्श्वभूमीवर आयुक्त गणेश देशमुख यांची तडकाफडकी बदली करून पनवेलकरांवर अन्याय केला असल्याची भावनाही त्यांनी यावेळी व्यक्त केली.
    पुरोगामी महाराष्ट्राने देशाला आणि जगाला आदर्श दिला मात्र हे दिशाहीन महाविकास आघाडी सरकार महाराष्ट्राला संकटातच अडकून ठेवू पाहत आहे, अशी खरमरीत टीका करून राज्य सरकारने आता तरी जागे व्हावे, असेही त्यांनी म्हंटले. 
    पनवेलसह खारघर, कामोठे, कळंबोली, नवीन पनवेल, खांदा कॉलनी त्याचबरोबर तालुक्यातील ग्रामीण भागात, गावागावात ठाकरे सरकारविरोधात घराच्या अंगणात उभे राहून काळ्या फिती, रिबन लावून, काळे झेंडे उंचावून तसेच काळे फलक हातात घेऊन 'माझं अंगण रणांगण', 'महाराष्ट्र बचाव' अंतर्गत लोकप्रतिनिधी, पदाधिकारी व कार्यकर्त्यांनी ठाकरे सरकारच्या विरोधात निषेध आंदोलन केले.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0