पनवेलमध्ये कोरोनाचा कहर
एकाच दिवशी २९ : रुग्ण २ व्यक्तींचा मृत्यू
पनवेल ; प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आज पुन्हा एकदा कोरोना ने थैमान घातले असून एकाच दिवसात तब्बल २९ रुग्ण आढळून आलेल्या आहेत तर दोन व्यक्तींचे दुःखद निधन झालेले आहे . तर २० रुग्ण बरे झालेले आहेत .
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोनाची आकडेवारी दिवसेंदिवस कमी-जास्त होताना पाहावयास मिळत आहे मात्र आज एकाच दिवसात तब्बल २९ रुग्ण कोणाचे आढळल्याने परिसरात चिंता व्यक्त होत आहे .
आज सापडलेल्या रुग्णांमध्ये खारघर , कळंबोली , पनवेल , कामोठे , नवीन पनवेल , खांदा कॉलनी या शहरांचा समावेश आहे .
तर कामोठे व पनवेल याठिकाणी च्या २ व्यक्तींचे आज रोजी दुःखद निधन झालेले आहे .
त्यामुळे शहरातील कोरोना रौद्ररूप दाखवत असल्याचे स्पष्ट होत आहे .
*खारघर* सेक्टर २१ एकलव्य सोसायटी या ठिकाणी एकाच कुटुंबातील २ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेल्या आहेत त्याचप्रमाणे खारघर सेक्टर ७ पटेल हेरिटेज या ठिकाणीदेखील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेल्या आहेत तसेच खारघर सेक्टर १५ घरकुल मकरंद सोसायटी या ठिकाणी १ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेली आहे
*कळंबोली* या ठिकाणीदेखील कोरोना चा प्रादुर्भाव दिवसेंदिवस वाढताना दिसत आहे कळंबोली सेक्टर १२ गणेश नगर झोपडपट्टी याठिकाणी १ महिलेला कोरोना ची लागण झाल्याचे समजते तसेच कळंबोली रोडपाली सेक्टर १२ याठिकाणी १ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेली आहे तसेच कळंबोली सेक्टर १ एलजी २ याठिकाणी १ व्यक्ती पॉझिटिव्ह आलेली असून सदर व्यक्ती बृहन्मुंबई महानगरपालिका अग्निशामक विभागात कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे कळंबोली सेक्टर ३ येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेल्या आहेत. त्याचप्रमाणे कळंबोली सेक्टर ५ येथील १ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेली आहे तसेच कळंबोली सेक्टर १२ गुरुद्वारा याठिकाणी असलेल्या झोपडपट्टीत राहणारे १ महिलेला कोरोना ची लागण झालेली आहे
*नवीन पनवेल*
सेक्टर ७ बिल्डिंग नंबर ३५ याठिकाणी १ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेली आहे तसेच
नवीन पनवेल सेक्टर १६ येथील लक्ष्मी विष्णू सोसायटी या ठिकाणी १ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेली आहे .
*कामोठे* शहरात नेहमीप्रमाणेच कोरोना चा संसर्ग मोठ्या प्रमाणात वाढताना दिसत आहे कामोठे सेक्टर ६ श्रीजी अपार्टमेंट येथील सहा वर्षाच्या १ मुलाला कोरोना ची लागण झालेली आहे, कामोठे सेक्टर ३५ रिद्धी सिद्धी सोसायटी या ठिकाणी १ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेली आहे.
त्याचप्रमाणे कामोठे सेक्टर ४ याठिकाणी एकाच कुटुंबातील २ व्यक्तींना लागण झालेली असून या दोन्ही व्यक्ती राबळे एमआयडीसी कार्यरत आहेत.
कामोठे सेक्टर ८ दीपक सोसायटी येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेल्या आहेत.
तसेच कामोठे सेक्टर २१ गंगा टॉवर येथील १ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेली आहे . तसेच कामोठे सेक्टर ११ प्रणव मिलन सोसायटी या ठिकाणी १ व्यक्ती पॉझिटिव आढळलेली आहे.
*खांदा कॉलनी*
येथील सेक्टर १ माऊली सोसायटी येथे १ व्यक्ती पोसिटिव्ह आलेली आहे .
*पनवेल* तक्का येथील प्रजापती कॉम्प्लेक्स याठिकाणी १ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेली आहे त्याचप्रमाणे पनवेल तक्का येथील याठिकाणी १ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेली आहे
तर दुःखाची ची बातमी मी म्हणजे कामोठा सेक्टर ११ येथील १ व्यक्ती त्याचप्रमाणे पनवेल साई नगर साई उद्यान येथील १ व्यक्ती अशा २ व्यक्तींचे निधन आज झालेले आहे.
तर कामोठे पनवेल खारघर व कळंबोली या ठिकाणच्या एकूण २० रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आलेला आहे