कळंबोलीतील महिलेचा मृत्यू
पनवेल परिसरात कोरोनाचे १४ नवीन रुग्ण : १५ जणांना डिस्चार्ज
कळंबोली : प्रतिनिधीलढवय्या रोखठोक
पनवेल परिसरात आज पुन्हा नव्याने १४ नवीन कोरोना बाधित रुग्णांची नोंद झालेली आहे
तर कळंबोलीतील सेक्टर १५ येथील एका महिलेचा मृत्यू झालेला आहे सदर महिलेला टायफाईड देखील असल्याने त्यांच्यावर उपचार सुरू होता . त्याच प्रमाणे या आधी उपचार घेत असलेले १५ रुग्ण पूर्णपणे बरे झालेले आहेत.
आज नवीन सापडलेल्या रुग्णांमध्ये खारघर ,नवीन पनवेल , कामोठे , कळंबोली , रोडपाली शहरांचा समावेश आहे.
खारघर येथील सेक्टर १२ येथील २ व्यक्ती कोरोना पोसिटिव्ह आढळलेली आहे .
नवीन पनवेल सेक्टर १३ याठिकाणी १ व्यक्ती पोसिटिव्ह आढळली आहे तसेच नवीन पनवेल सेक्टर १४ येथील १ महिला कोरोना पोसिटिव्ह आढळली आहे . तसेच नवीन पनवेल सेक्टर १ एस येथे १ महिला कोविड पोसिटिव्ह आढळलेली आहे त्याच प्रमाणे नवीन पनवेल सेक्टर ५ ए हरिमन सोसायटी याठिकाणी १ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळली आहे.
कामोठे सेक्टर २० याठिकाणी १ महिला पोसिटिव्ह आढळली आहे तर कामोठे सेक्टर २१ या ठिकाणी १ महिला त्याचप्रमाणे , कामोठे सेक्टर ३५ याठिकाणी आणि १ व्यक्ती तसेच कामोठे सेक्टर ७ येथे एकाच कुटुंबातील २ व्यक्ती व कामोठे सेक्टर ११ याठिकाणी १ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या आहेत
तर कळंबोली सेक्टर १ याठिकाणी १ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली आहे ही व्यक्ती पोलीस कर्मचारी असल्याचे समजते तसेच रोडपाली सेक्टर २० याठिकाणी १ व्यक्ती कोरोना पॉझिटिव आढळलेली आहे अशा एकूण १४ व्यक्ती आज आढळलेले आहेत .
तर आज आज कामोठे येथील ७ कळंबोली येथील ३ खारघर येथील २ नवीन पनवेल येथील २ व पनवेल येथील १ व्यक्ती अशा १५ व्यक्तींना डिस्चार्ज देण्यात आला आहे .