बिगबाजारवर गुन्हा दाखल : आयुक्तांच्या आदेशाचा भंग नाडला - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

बिगबाजारवर गुन्हा दाखल : आयुक्तांच्या आदेशाचा भंग नाडला

ओरियन मॉलच्या बिगबाजारवर  गुन्हा दाखल :
 आयुक्तांच्या आदेशाचा भंग नाडला
 
 

पनवेल :  प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक


  पनवेल महानगरपालिकेने दिलेल्या वेळेत ठराविक दुकाने उघडी ठेवावीत नियमांचे उल्लंघन करू नये असे सक्तीचे आदेश असताना देखील या आदेशांना केराची टोपली दाखवत ओरियन मॉल याठिकाणी असलेल्या बिगबाजार या दुकानात कपड्याची विक्री सुरू असल्याची माहिती महापालिकेला मिळाल्यानंतर महापालिकेने संबंधित बिगबाजारवर कारवाई केली आहे .
आयुक्तांच्या आदेशाने लाॅकडाऊन कालावधीत काही दुकाने विशिष्ट दिवशी उघडण्याची काही अटींवर परवानगी दिली होती. कोरोना चा प्रकोप कमी व्हावा यासाठी लाॅकडाऊन वाढविण्यात आलेला आहे. परंतु दैनंदिन जीवन देखील त्यामुळे प्रभावित होत आहे. यासाठी शासनाने काही बाबतीत सवलती देण्याचा अधिकार त्या त्या स्थानिक प्राधिका-यांना दिलेला आहे. परंतु याकडे दुर्लक्ष करून काही दुकानदार वैयक्तिक फायद्यासाठी कायद्याचा भंग करत आहेत असे निदर्शनास आले आहे .
पनवेल ओरियन मॉल मध्ये आज  कापडाचे दुकान चालू ठेवून मनपा ने ठरून दिलेल्या नियमाचे उल्लंघन केले असल्याने गुन्हा दाखल करण्यात आला आहे.  प्रभाग समिती "ड" चे प्रभाग अधिकारी दशरथ भंडारी यांनी आयुक्त सुधाकर देशमुख यांच्या आदेशाने सदरचे दुकान बंद करून त्यांच्यावर भारतीय दंड संहिता १८६० च्या कलम १८८ नुसार गुन्हा दाखल केला आहे.
  अतिक्रमण पथक प्रमुख रोशन पोपेटा आणि प्रभाग अधिकारी तथा इन्सीडंट कमांडर दशरथ भंडारी यांनी कारवाई केली.
    पनवेल महानगरपालिका हद्दीत जर कोणी लाॅकडाऊनच्या आदेशांचे उल्लंघन करताना आढळल्यास त्यांचेवर कठोर कारवाई करण्यात येईल असे
 उपायुक्त जमीर लेंग्रेकर यांनी सांगितले .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0