खारघर येथील महिलेचा मृत्यू : पनवेल क्षेत्रात नवीन १८ रुग्ण - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

खारघर येथील महिलेचा मृत्यू : पनवेल क्षेत्रात नवीन १८ रुग्ण

खारघर येथील महिलेचा मृत्यू :

 पनवेल क्षेत्रात नवीन १८ रुग्ण

पनवेल : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक

पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील आज  नवीन १८ कोरोना बाधित रुग्ण आढळलेले असून खारघर येथील एका महिलेचा मृत्यू झालेला आहे तर १८ रुग्ण बरे होऊन त्यांना घरी सोडण्यात आलेले आहे
  पनवेल मध्ये हे आज पुन्हा एकदा कोरोना ने मुसंडी घेत एकूण १८ रुग्णांवर आपला प्रादुर्भाव दाखवलेला आहे .
 आज आढळलेल्या रुग्णांमध्ये कामोठे, खारघर , कळंबोली , नवीन पनवेल , खांदा कॉलनी , तळोजा पालेखुर्द येथील भागांचा समावेश आहे .
   *कामोठे*
 येथील सेक्टर ३५ याठिकाणी एकाच कुटुंबातील २ व्यक्ती पोसिटिव्ह आढळले आहेत.
 त्याच प्रमाणे सेक्टर ९ या ठिकाणी १ व्यक्ती पोसिटिव्ह आढळली आहे.
 तसेच येथील एका हॉस्पिटल मधील १ व्यक्ती पोसिटिव्ह आढळली आहे .
  त्याच प्रमाणे सेक्टर ६ याठिकाणी १ व्यक्ती पोसिटिव्ह आढळलेली आहे .
त्याच प्रमाणे सेक्टर २१ याठिकाणी देखील १ व्यक्ती पोसिटिव्ह आढळला आहे .
 *खारघर*
 येथील सेक्टर २१  एक व्यक्ती पोसिटिव्ह आढळलेली आहे.
तसेच खारघर सेक्टर ८ येथील १ व्यक्ती पोसिटिव्ह आढळली आहे .
 तसेच सेक्टर ८ ए येथील १ व्यक्ती कोरोना पोसिटिव्ह आढळली आहे .
*नवीन पनवेल*
  याठिकाणी सेक्टर १३ जनता मार्केट याठिकाणी १ व्यक्ती पोसिटिव्ह आढळली आहे .
तसेच सेक्टर १४  येथील आठ वर्षाच्या १ मुलाला लागण झालेली आहे .
तसेच सेक्टर १३ ए टाईप येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती पोसिटिव्ह आढळले आहेत .

*कळंबोली*
    सेक्टर १ ई येथील १ व्यक्ती पोसिटिव्ह आढळलेली आहे सदर व्यक्ती बेस्ट चालक आहे .
सेक्टर १३ येथील साईसदन येथील १ व्यक्ती पोसिटिव्ह आलेली आहे .
  *खांदा कॉलनी*
   येथील सेक्टर ९ येथील १ व्यक्ती पोसिटिव्ह असलेली आहे .
 तसेच सेक्टर १५ येथील १ पोलीस कर्मचाऱ्याला कोरोनाची लागण झाली आहे .
*तळोजा*
 येथील पालखुर्द येथील १ व्यक्तीला कोरोनाची लागण झालेली आहे
 तळोजातील गांधारऑइल येथे कामाच्या ठिकाणी त्याला लागण झाल्याचे निष्कर्ष आहे .
  तर नवीन पनवेल , कामोठे , खारघर , कळंबोली येथील १८ रुग्णांना उपचारानंतर डिस्चार्ज देण्यात आला आहे .

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0