कोरोनाचे पनवेलात ९ रुग्ण
६ महिन्याच्या बाळाचा समावेश
पनवेल ; प्रतिनिधी
लढवय्या रोखठोकपनवेल महानगरपालिका परिसरातील कोरोनाची संख्या दिवसेंदिवस वाढतच जात आहे.
आज आज पनवेल महानगरपालिका हद्दीतील कामोठे, खारघर या परिसरात तब्बल करणाचे ९ रुग्ण आढळून आलेले असून त्यात एका ६ महिन्याच्या बाळाचा समावेश आहे.
तसेच उपचार घेत असलेले ४ रुग्ण बरे झाल्याची माहिती पनवेल महानगरपालिकेने दिली आहे.
आज खारघर सेक्टर-२२ येथील ३१ वर्षीय १ व्यक्ती कोविड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती शिवडी मुंबई येथे मेडलाईफ ई कॉमर्स कंपनीमध्ये मॅनेजर आहे. या व्यक्तीला कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
तसेच खारघर सेक्टर-३५ई येथोल ५३ वर्षाव १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्तीचा मुलगा यापुर्वी काव्हिड-१९ पॉझिटिव आलेला होता. हया व्यक्तीला त्याच्या मुलापासूनच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
त्याच प्रमाणे कामोठे सेक्टर-१२ येथोल ४५ वर्षोय १ व्यक्ती कोविड १९ पॉझिटिव्ह आलेली आहे. ही व्यक्ती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये रुग्णवाहिका वाहनचालक म्हणून कार्यरत आहे. सदर व्यक्तीला मुंबईमध्येच रुग्णास ने-आण करतेवेळी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
तसेच कामोठे सेक्टर १० येथील वर्षाय १ व्यक्ती कोव्हिड-२९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती शताब्दी हॉस्पीटल, गोवंडी येथे बॉर्ड बॉय म्हणून कार्यरत आहे. हया व्यक्तीला त्याच्या कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
तसेच कामोठे सेक्टर-११ येथील ६ महिन्याचा १ मुलगा कोव्हिड-१९ पोसिटीव्ही आलेला आहे. सदर मुलाच्या कुटुंबातील ३ व्यक्ती यापुर्वी कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.
सदर मुलाला त्यांच्यापासूनच संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे. तसेच पनवेल एम.जी.रोड टपालनाका येथील २९ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
ही व्यक्ती मुंबई येथे पोलिस कर्मचारी आहे. सदर व्यक्तीला मुंबई येथे कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे. कामोठे सेक्टर-३४ येथील २९ वर्षीय महिला कोव्हिड-१९ पोसिटीव्ही आलेली आहे. सदर महिला सेंट जॉर्ज हॉस्पीटल, मुंबई येथे स्टाफ नर्स म्हणून कार्यरत असून ती कोव्हिड-१९ पेशन्टसाठी सेवा देत होती. त्यांना हॉस्पीटलमध्येच संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
कामोठे सेक्टर-०६ येथील ४२ वर्षीय १ व्यक्ती कॉव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती यूव्हीएस फार्मा कंपनी, गोवंडी येथे कार्यरत असून त्यांना कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचे प्राथमिक निष्कर्ष आहे.
नविन पनवेल सेक्टर-४ येथील ५४ वर्षाय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती रिलायन्स कंपनीमध्ये कार्यरत असून त्या व्यक्तीला कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहेत तर
कामोठे सेक्टर-२० येथील १ महिला याआधी कोव्हिड-१९ पॉजिटिक आली होती. सदर महिलेची काविड १९ ची अंतिम चाचणी निगेटिव्ह आली असून ती पुर्णपणे बरी झाली आहे. त्यांना आजरोजी घरी सोडण्यात आले आहे. त्याच प्रमाणे कामोठे सेक्टर-११ येथील ५९ वर्षीय १ व्यक्ती याआधी कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आली होती. सदर व्यक्तीची कोकिड-११ ची अंतिम चाचणी नेगेटिव्ह आली असून ते पुर्णपणे बरे झाले आहे. त्यांना आजरोजी घरी सोडण्यात आले आहे. तसेच खारघर सेक्टर-३६ येथील ३५ वर्षीय १ व्यक्ती याआधी कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आली होती. सदर व्यक्तीची कोव्हिड-१९ ची अंतिम चाचणी नेगेटिव्ह आली असून ते पुर्णपणे बरे झाले आहे. त्यांना आजरोजी घरी सोडण्यात आले आहे.
पनवेल येथील १ व्यक्ती याआधी कोकिड-१९ पोसिटीव्ही आली होती. सदर व्यक्तीची कोविड-१९ ची अतिम चाचणी निगेटिव्ह आली असून ते पुर्णपणे बरे झाले आहे. त्यांना आजरोजी घरी सोडण्यात आले आहे.