ज्वेलर्स दुकाने खुली करा : पनवेल ज्वेलर्स संघटनेची मागणी
पनवेल : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक
पनवेल सराफ ऍण्ड ज्वेलर्स असोसिएशन यांनी पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील ज्वेलर्स दुकाने आठवड्यातून तीन दिवस उघडण्याची मागणी केलेली आहे.
याबाबत महापालिकेला ई-मेल द्वारे या मागणीचे पत्र पाठवण्यात आलेले आहे.
गेल्या काही महिन्यांपासून कोरोनाने थैमान घातले आहे .
पनवेल जेव्हलर्स असोसिएशन ने या बंदला दोन महिने कडकडीत पाठिंबा दिला मात्र पनवेल महापालिकेच्या निकषानुसार व अटी शर्तीचे पालन करून ज्या प्रकारे इतर आस्थापनांना आठवड्यातून तीन दिवस दुकाने ९ ते ५ या वेळेत उघडण्याची जी मुभा दिलेली आहे त्याच प्रकारे ज्वेलर्स या दुकानांना देखील अशाप्रकारे परवानगी देण्यात यावी असे या पत्रात म्हटले आहे .
पनवेल ज्वेलर्स असोसिएशनचे अध्यक्ष चतरलाल मेहता यांनी सांगितले की अत्यावश्यक दुकानांच्या नावावर पनवेल परिसरात कापड गल्ली नियमांचे उल्लंघन करून काही दुकाने उघडली जात आहेत .
आम्हला परवानगी दिली तर आम्ही महानगरपालिकेच्या आदेशाचे संपूर्ण पालन करून सोशल डिस्टन्सचे नियम काटेकोर पाळून दुकाने चालवणार असल्याचा विश्वास त्यांनी व्यक्त केलेला आहे तर नियमांचे उल्लंघन झाले तर आमची दुकाने सील करावीत असे लढवय्याशी बोलताना ते म्हणाले.
बरेच ज्वेलर्स दुकानदार हे मोठ-मोठ्या भाड्याच्या गळ्यांमध्ये आपला व्यापार करत आहेत व बंद काळात त्यांना मोठ्या अडचणींना सामोरे जावे लागत आहे त्यामुळे याबाबत पनवेल महानगरपालिकेने सकारात्मक विचार करून निर्णय घ्यावा अशी मागणी पनवेल सराफ अँड ज्वेलर्स यांनी केली आहे .