पनवेल परिसरात १० कोरोनाचे रुग्ण तर २ रुग्ण बरे - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेल परिसरात १० कोरोनाचे रुग्ण तर २ रुग्ण बरे

  पनवेल परिसरात १० कोरोनाचे रुग्ण तर २ रुग्ण बरे
पनवेल : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक
पनवेल महानगरपालिका हद्दीमध्ये आज नव्याने कोरोना दहा रुग्ण आढळून आले आहेत तर दोन रुग्ण बरे होऊन घरी गेलेले आहेत पनवेल महानगरपालिका परिसरात दिवसेंदिवस कोरोना रुग्णांची संख्या ही वाढताना दिसत आहे त्यामुळे नागरिकांनी स्वतःची काळजी घे शासकीय नियमांचे पालन करण्याचे आवाहन वारंवार केले जात आहे.
  खारघर, सेक्टर-२१, ज्ञानसाधना सोसायटी येथील ५३ वर्षय १ व्यक्ती कोव्हिड १९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
कामोठे, सेक्टर-१७, रिध्दी सिध्दी दर्शन सोसायटी येथील ३३ वर्षीय १ महिला कोविड-१९ पोसिटीव्ह आलेली आहे. सदर महिलेचे पती गोवंडी येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत असून ते याआधीच कोविड-१९ पॉझिटिव्ह आलेले आहेत.
  कामोठे, सेक्टर-८, महावीर वास्तु येथील ४३ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-२९ पोसिटीव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती तालुका पोलीस स्टेशन, पनवेल येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. सदर व्यक्ती मारुतीधाम सोसायटी, कामोठे येथील नातेवाईकाच्या मेडिकल स्टोअर्समध्ये जात होती. सदर सोसायटीमध्ये याअगोदरच दोन व्यक्ती पॉझिटिव्ह आलेल्या आहेत.
  नविन पनवेल, सेक्टर-१५. गुलमोहर पार्क येथील ४५ वर्षीय १ व्यक्ती कोविड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती वकिल म्हणून कार्यरत असून उमरोली, पनवेल येथील याआधीच कोव्हिड-१९ पोसिटीव्ह आली आहे त्यांचे जवळचे नातेवाईक यांच्या संपर्कात येऊनथ त्यांना संसर्ग झाल्याचा अतिम निष्कर्ष आहे. त्याचप्रमाणे
  कामोठे, सेक्टर-६, अनंत वाटिका सोसायटी येथील ३५ वर्षीय १व्यक्ती कोविड-१९ पोसिटीव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती नायगाव, मुंबई येथे पोलिस कर्मचारी मणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
कामोठे, सेक्टर-३४. मानसरोवर कॉम्प्लेक्स रथील ६१ वर्षीय १ महिला कोहिड-१९ पोसिटीव्ह आलेली आहे. सदर महिलेच्या घरातील तीन व्यक्ती याअगोदरच कॉव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या होत्या. त्यांच्या संपर्कात येऊनच या महिलेला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
खारघर, सेक्टर-८, भुमी हाईट्स येथील ५६ वर्षीय १ व्यक्ती कोविङ-१९ पोसिटीव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती टाटा पाँवर,
चंबूर येथे अभियंता महणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
तसेच कामोठे, सेक्टर-१४. लेक युव अपार्टमेंट येथील ३३ वर्षाय १ व्यक्ती कॉंव्हिड-१९ पझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सफाई कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
  खांदा कॉलनी, सेक्टर-७.विजन सोसायटी येथील २९ वर्षीय १ व्यक्ती कोविड-१९ पोसिटीव्ह आलेली आहे. ही व्यक्ती घाटकोपर येथे फार्मासिस्ट म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
खारघर, सेक्टर-१०.सनसिटी सोसायटी येथील ५१ वर्षाय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पोसिटीव्ह आलेली आहे.
  सदर व्यक्ती बँक ऑफ इंडिया, शाखा माजगाव येचे मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
*तर आज २ रुग्ण बरे*

खारघर येथील एका व्यक्तीची कोव्हिड-१९ ची अंतिम चाचणी निगेटिव्ह आली असून ती पुर्णपणे बरी झाली आहे. त्यांना आजरोजी घरी सोडण्यात आले आहे.तर कामोठे येथील १ व्यक्तीची कोविड-१९ ची अंतिम चाचणी निगेटिव्ह आली असून ती पुर्णपणे बरी झाली आहे. त्यांना आजरोजी घरी सोडण्यात आले आहे.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0