पनवेल परिसरात कोरोनाचे ३ रुग्ण : १ रुग्ण कोरोनातून बरा . - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेल परिसरात कोरोनाचे ३ रुग्ण : १ रुग्ण कोरोनातून बरा .

पनवेल परिसरात कोरोनाचे ३ रुग्ण : १ रुग्ण कोरोनातून बरा .

कळंबोली : लढवय्या रोखठोक



 पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील आज ३ व्यक्ती कॊरोना पोसिटीव्ह असल्याचे आढळले आहेत . तर नवीन पनवेल येथील १ व्यक्ती बरी झाल्याचे वृत्त आहे .
  कळंबोली सेक्टर-२ई येथील ६३ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 सदर व्यक्ती पॅरालिसीसच्या उपचारासाठी डी.वाय.पाटील रूग्णालय, नेरुळ येथे गेली होती. त्यानंतर ही व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे.
 सदर रुग्णालयात त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
तसेच कामोठे सेक्टर-३६ येथील ३४ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती यु.व्ही.एस फार्मा कंपनी . गोवंडी येथे कार्यरत आहे. यापूर्वी सदर कंपनीत कामावर असताना अन्य २ व्यक्तीना संसर्ग झालेला आहे. त्यामुळे सदर व्यक्तीला सुध्दा या कंपनीतच संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
त्याचप्रमाणे तळोजा येथील २७ वर्षीय १ महिला कोव्हिड १९ पॉझिटिव आलेली आहे. ही महिला काही दिवसांपुर्वी दहिसर येथून तळोजा येथे आपल्या माहेरी आलेली आहे. सदर महिलेचे पती कामानिमित्त दहीसर ते तळोजा ये-जा करतात. त्यामुळे त्यांच्या पतीमार्फतच या महिलेला दहीसर, मुंबई येथून संसर्ग झाला असावा असा प्राथमिक निष्कर्ष आहे.





महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0