पनवेलमध्ये एकाच दिवशी २० रुग्ण : ८ रुग्ण बरे - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेलमध्ये एकाच दिवशी २० रुग्ण : ८ रुग्ण बरे

पनवेलमध्ये कोरोनाचा वाढता ओघ

एकाच दिवशी २० रुग्ण : ८ रुग्ण बरे 

 पनवेल : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक

 पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना बाधित रुग्ण दिवसेंदिवस वाढत असून आज एकाच दिवशी
तब्बल २० रुग्ण आढळले आहेत तर ८ रुग्ण बरे झाले आहेत .
  पनवेल महानगरपालिका  हद्दीतील कळंबोली ,नवीन पनवेल  ,खारघर , कामोठे भागात हे रुग्ण आढळले असून शहरात
चिंतेच सावट पसरलेले आहे .
   *खारघर*  घरकुल ,यशवंत गायकरचाळ ,मयांक रेसीडन्सी , अशोका रेसिडन्सी  ,वास्तूविहार , घरकुल कुंजविहार व ज्ञानसाधना सोसायटी असे  एकूण ८  ,
 *कळंबोली* येथील गुरूकुटीर कॉम्प्लेक्स व न्यू संकूल सोसायटी येथील  प्रत्येकी १ असे २ रुग्ण कोरोना पोसिटीव्ह आढळले आहेत .
  *कामोठे*  विस्ता कार्नर येथील  १ व्यक्ती  , तिरूपती एन्क्लेक १ , मारुतीधाम सोसायटी येथील एकाच कुटुंबातील ३ ,साईसागर सोसायटी येथील १, विजयदिप अपार्टमेंट १ , वास्तुविहार सोसायटी १ , घरकुल विहार येथील ५५ वर्षीय १ , अष्टविनाय कृपा सोसायटी येथील ३६ वर्षीय १ महिला कोविड १९ पॉझिटिव्ह आल्यानंतर दिनांक ३०/०४/२०२० ते १२/०५/२०२० दरम्यान जी.टी.हॉस्पीटल, मुंबई येथे उपचार घेऊन पूर्णपणे बरी होऊन त्यांना घरी सोडण्यात आले आहे. याबाबतची माहिती शासनाकडून पनवेल महानगरपालिकेला आजरोजी प्राप्त झाली आहे.

  *नविन पनवेल*
    ए-टाईप येथील  १ व्यक्ती कोविड १९ पोसिटीव्ह आलेली आहे .

*८ बरे रूग्ण*

कामोठे येथील ५ व्यक्ती पुर्णपणे बऱ्याझाल्या आहेत, त्या सर्वांना आजरोजी घरी सोडण्यात आले आहे.
  तसेच खारघर येथील २ व्यक्ती पुर्णपणे बऱ्या झाल्या आहेत. त्याना  आजरोजी घरी सोडण्यात आले आहे.
पनवेल येथील १
व्यक्ती पूर्णपणे बरी झाली आहे.


महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0