गावावरून परतलेल्या कुटुंबाची हेळसांड : माणुसकीला काळीमा फासणारी घटना - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

गावावरून परतलेल्या कुटुंबाची हेळसांड : माणुसकीला काळीमा फासणारी घटना

गावावरून परतलेल्या कुटुंबाची हेळसांड                                                                                          

माणुसकीला काळीमा फासणारी घटना 

नवीमुंबई : प्रतिनिधी 

लढवय्या रोखठोक



 मजूर गावी जाऊ नये मुंबईत रहावा यासाठी महाराष्ट्राचे मुख्यमंत्री प्रयत्न करत असतानाच नवीमुंबईत मात्र
७ तास बायको आणि मुलांसह उन्हात ताटकळत राहण्याची वेळ
एका कुटुंबावर आली .
  कुर्जुलेहऱ्या  ता पारनेर जिल्हा अहमदनगर येथून आज सकाळी बाळू आंधळे  हे आपल्या गावावरून नवी मुंबईत परतले. येताना मेडिकल सर्टिफिकेट शासनाचा नवीमुंबईत येण्याचा रीतसर परवाना त्यांनी काढला होता. त्यांची पत्नी व दोन मुले  हे सकाळी जेव्हा जुईनगर सेक्टर २३ मधील श्रीकानोबा छाया या सोसायटी मध्ये आले तेव्हा त्यांना तेथील कमिटीने त्याठिकाणी प्रवेश दिला नाही . 
  आंधळे कुटुंबांनी  त्यांच्या घरमालकांना बोलावले असता घरमालक स्वत: डॉक्टर आहेत त्यांनीही समजून सांगितले परंतु त्यांचे  कोणीही ऐकले नाही घरमालकांनी वैद्यकीय अधिकारी पुष्पा जवादे यांना संपर्क केला असता त्यांनी हि सोसायटी अध्यक्ष सचिव यांना समजावून सांगितले त्या कुटुंबाला १४ दिवस घरी राहण्याचे सुचविले तरी सोसायटीने त्यांचेही ऐकले नाही . त्यानंतर हे कुटुंब आपली फिर्याद घेवून  नेरूळ वार्ड अधिकारी  तायडे यांच्या कडे गेले असता सोसायटीने त्यांचेही म्हणणे ऐकले नाही . अखेरीस हे कुटुंब पोलीस स्टेशन ला गेले त्यानंतर पोलीसांनी मध्यस्थी केली असता त्यांना शिरवणे आरोग्य केंद्रातुन मेडिकल सर्टिफिकेट घेण्यास सांगण्यात आले . शेवटी हे कुटुंब मेडिकल सर्टिफिकेट घेऊन आल्यानंतर सोसायटीने यांच्या हातावर शिक्का नसल्याचे कारण पुढे करत प्रवेश पुन्हा नाकरला. पुन्हा या कुटुंबास पोलीस स्टेशन गाठावे लागले  त्यानंतर या पोलिसांच्या आदेशाने कुटुंबास प्रवेश मिळाला .
  सकाळी ९ वाजल्यापासून संध्याकाळी ४ वाजेपर्यंत ओला चालवणाऱ्या या गरीब कुटुंबाचे हाल सुरु होते.
   स्थानिक मनसे विभाग अध्यक्ष अक्षय भोसले , शाखा अध्यक्ष मयूर कारंडे , पत्रकार सुर्यकांत गोडसे  यांनी त्यांना   मदत केली .
  या प्रकारामुळे नवी मुंबईकरांमध्ये नाराजी पसरली असून संबंधितांवर कारवाईची मागणी आता केली जाऊ लागली आहे.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0