पनवेल महापालिका हद्दीत १९ रुग्ण : एकाचा मृत्यू - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेल महापालिका हद्दीत १९ रुग्ण : एकाचा मृत्यू

पनवेल महापालिका हद्दीत १९ रुग्ण : एकाचा मृत्यू 

पनवेल : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक


पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना चा धक्कादायक आकडा समोर आलेला असून आज कोरोनाचे चे तब्बल १९ रूग्ण पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आढळलेले असून त्यामधील १ रुग्णांचा मृत्यू झालेला आहे.
  त्यामुळे कळंबोली शहरात चिंता व्यक्त केली जात आहे . तर १४ रुग्णांना डिस्चार्ज देण्यात आलेला आहे .
  आज सापडलेल्या रुग्णांमध्ये कामोठे , खारघर , कळंबोली , खांदा कॉलनी , नवीन पनवेल  या शहरांचा समावेश आहे .
यापैकी कळंबोली सेक्टर ३ येथील ३७ वर्षे १ व्यक्तीचा आज मृत्यू झालेला आहे.
  कामोठे सेक्टर १२ या ठिकाणी एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या आहेत तसेच कामोठे सेक्टर ८ याठिकाणी १ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेली आहे. त्याचप्रमाणे कामोठे सेक्टर ३५ याठिकाणी १ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेली आहे . तसेच कामोठे सेक्टर २१ या ठिकाणी एकाच कुटुंबातील २ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेल्या आहेत तसेच कामोठे सेक्टर १६ याठिकाणी २ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेल्या आहेत .
  खारघर याठिकाणी सेक्टर १५ येथील १ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेली आहे ही व्यक्ती पोलीस उपनिरीक्षक असल्याची माहिती मिळत आहे त्याचप्रमाणे खारघर सेक्टर १४ याठिकाणी १ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह  आढळलेली आहे  तसेच खारघर सेक्टर ५ याठिकाणी १ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेली आहे .
तसेच नवीन पनवेल सेक्टर १२ याठिकाणी १ व्यक्ती पॉझिटिव्ह आलेली असून ही व्यक्ती हिंदुजा हॉस्पिटल येथे कार्यरत होती.
  खांदा कॉलनी सेक्टर १० याठिकाणी देखील १ महिला रुग्ण कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली आहे तसेच कळंबोली सेक्टर १७ या ठिकाणी एकाच कुटुंबातील २ व्यक्ती ती त्याच प्रमाणे कळंबोली सेक्टर ३ येथील एकाच कुटुंबातील २ व्यक्ती अशा एकूण ४ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या आहेत.
   तर कामोठे , खारघर , कळंबोली व नवीन पनवेल या ठिकाणच्या एकूण १४ रुग्णांना आज डिस्चार्ज देण्यात आलेला आहे.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0