पनवेल कोरोनाचे २० रुग्ण : तळोजा ओवे व नावडे भागात संसर्ग - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेल कोरोनाचे २० रुग्ण : तळोजा ओवे व नावडे भागात संसर्ग

पनवेल कोरोनाचे २० रुग्ण 

 तळोजा ओवे व नावडे भागात संसर्ग 


तळोजा : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक

पनवेल महानगरपालिका क्षेत्रात कोरोना ने आपले हातपाय पसरायला सुरुवात केली असून आज रोजी नव्याने २० रुग्ण पनवेल महानगरपालिका क्षेत्रात आढळलेले असून आता कोरोना पॉझिटिव्ह एकूण रुग्णांची संख्या ३७१ वर पोहोचली आहे .
  आज सापडलेल्या रुग्णांमध्ये  कामोठे , नवीन पनवेल , तळोजे, पनवेल   व नावडे भागाचा समावेश आहे तर १२ रुग्णांना आज उपचारानंतर रुग्णालयातून घरी सोडण्यात आलेले आहे.
   आज सापडलेल्या रुग्णांमध्ये कामोठे सेक्टर ३५ या ठिकाणी एकाच कुटुंबातील ५ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आलेले आहेत . तसेच कामोठे सेक्टर ८ याठिकाणी एकाच कुटुंबातील २ व्यक्ती  पॉझिटिव्ह आढळलेल्या आहेत.
 त्याचप्रमाणे कामोठे सेक्टर ९ याठिकाणी आणि एकाच कुटुंबातील २ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेल्या आहेत. त्याचप्रमाणे कामोठे सेक्टर २१ याठिकाणी १ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेले असून वडाळा डेपो याठिकाणी उपअभियंता म्हणून ते कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे ., तसेच कामोठे सेक्टर १० याठिकाणी १ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेले आहे .
  नवीन पनवेल सेक्टर ५ ए हरीमल सोसायटी या ठिकाणी एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या आहेत
 सदर कुटुंब प्रमुख यादी पॉझिटिव्ह आलेला होता व त्याला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याची माहिती  प्राप्त झालेली आहे.
  त्याचप्रमाणे नवीन पनवेल सेक्टर १३ ए टाईप  प्लॉट ६२ या ठिकाणी १ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली आहे .
  तसेच नवीन पनवेल सेक्टर १६ क्लासिक कल्पतरू सोसायटी याठिकाणी १ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेली आहे.
 नवीन पनवेल सेक्टर १३ ए टाईप याठिकाणी १ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आलेली आहे .
 तळोजा ओवे पेठ येथील ५५ वर्षीय १ महिला पॉझिटिव्ह आढळलेली आहे तसेच पनवेल तक्का मोराज रिवर साईट याठिकाणी १ व्यक्ती पॉझिटिव्ह आढळलेली आहे.
 तसेच नावडे फेज २ देव दृष्टी सोसायटी याठिकाणी १ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली आहे. तर कामोठे , खारघर ,कळंबोली या ठिकाणच्या एकूण १२ व्यक्ती कोरोना मुळे बऱ्या झाल्या असून त्यांना आज रोजी घरी सोडण्यात आलेले आहे.महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0