पनवेल कोरोनाचा आकडा २८९ वर: नवे १८ रूग्ण आढळले - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेल कोरोनाचा आकडा २८९ वर: नवे १८ रूग्ण आढळले

पनवेल कोरोनाचा आकडा २८९ वर: नवे १८ रूग्ण आढळले 

पनवेल : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोक

     पनवेल महानगरपालिका परिसरातील कोरोना रुग्णांची संख्या आता २८९ इतकी झालेली आहे दररोज वाढत जात असलेल्या आकड्या मुळे परिसरात चिंता व्यक्त केली जाऊ लागली आहे . त्यातच आज पनवेल महानगरपालिका हद्दीत नव्याने १८ रुग्णांची नोंद करण्यात आलेली आहे.  दिवसेंदिवस कमी-जास्त प्रमाणात वाढ होताना दिसत आहे.
  आज आढळलेल्या रुग्णांमध्ये कळंबोली , पनवेल तक्का , कामोठे , खारघर , काळुंद्रे या भागांचा समावेश आहे
  यामध्ये खारघर येथील सेक्टर १७ शांतिनिकेतन सोसायटी येथील १ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आलेली आहे तर खारघर येथील सेक्टर २ विघ्नहर्ता सोसायटी या ठिकाणची १ व्यक्ती अशा एकुण २ व्यक्ती खारघरमध्ये पॉझिटिव आढळलेले आहेत .
 त्याचप्रमाणे कळंबोली सेक्टर १ई सत्यसंस्कार सोसायटी या ठिकाणी १ महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळले आहे , तसेच कळंबोली सेक्टर १५ पामविहार सोसायटी याठिकाणी एकाच कुटुंबातील २ व्यक्ती कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या आहेत तसेच कळंबोली सेक्टर ३ ई परिसरात १ व्यक्ती तसेच कळंबोली सेक्टर १ई तिरुपती कॉम्प्लेक्स येथे १ महिला  अशाप्रकारे कळंबोली मध्ये एकूण ५ व्यक्ती आज कोरोना पॉझिटिव्ह आढळलेल्या आहेत त्याच प्रमाणे पनवेल तक्का याठिकाणी कल्पतरू रिव्हरसाईड सोसायटी कावेरी बिल्डिंग येथील १ महिला कोरोना पॉझिटिव्ह आढळलेली आहे प्रमाणे कामोठे सेक्टर १८ हरिओम कॉम्प्लेक्स याठिकाणी २ त्याचप्रमाणे कामोठे सेक्टर ५ स्टार ए वन सोसायटी या ठिकाणी १ तसेच कामोठे सेक्टर २१ शुभ आर्केड याठिकाणी १
 कामोठे सेक्टर  २२ ग्रीन पार्क येथील १ अशा एकूण ५ व्यक्ती कामोठ्या मध्ये आढळले आहेत
  त्याच प्रमाणे काळुंद्रे पनवेल याठिकाणी एकूण ५ व्यक्ती करोना पॉझिटिव्ह आढळले आहे.
   तर कामोठे नवीन पनवेल खारघर तळोजा या ठिकाणातील एकूण ७ रुग्ण करोना मुक्त झालेले आहेत

  

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0