पनवेल ग्रामीण भागात ७ कोरोनाचे रुग्ण : एकाच घरातील ५ जणांना लागण
पनवेल ; प्रतिनिधीलढवय्या रोखठोक
पनवेल महानगरपालिका क्षेत्रात १० रुग्ण कोरोना बाधित आढळल्यानंतर पनवेल ग्रामीण भागात नव्याने ७ रुग्ण आढळले आहेत यामध्ये ते उमरोली उलवे या भागांचा समावेश आहे.
उमरोलि येथील एकाच कुटुंबातील ५ व्यक्तींना कोरोनाची लागण झालेली असून त्यांचे रिपोर्ट पॉझिटिव्ह आलेल्या आहेत
त्याचप्रमाणे उलवे या ठिकाणीदेखील ४२ वर्षीय व्यक्ती कोविड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे ,
ही व्यक्ती एपीएमसी मार्केट वाशी याठिकाणी व्यवसाय करत असल्याची माहिती मिळत आहे .
तसेच उलवे येथील ३२ वर्षीय व्यक्ती कोविड१९ पॉझिटिव आलेली आहे सदर व्यक्ती मुंबई येथील एका बँकेत कार्यरत असल्याची माहिती मिळत आहे त्यामुळे आता पनवेल ग्रामिण एकूण कोरोना पोसिटिव्ह रुग्णांची संख्याही ७४ झालेली असून पनवेल महानगरपालिकेची एकूण आकडेवारी १९९ इतकी पोहचली आहे.