पनवेल परिसरात ९ नवीन रुग्ण आढळले : तर ४ रुग्ण बरे - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेल परिसरात ९ नवीन रुग्ण आढळले : तर ४ रुग्ण बरे

पनवेल परिसरात ९ नवीन रुग्ण आढळले
   तर ४ रुग्ण बरे
कळंबोली :  लढवय्या रोखठोक

पनवेल महानगरपालिका हद्दीत आज कोरोना बाधित ९ रुग्णांचे नोंद झालेले असून त्यापैकी ४ रुग्ण बरे झाल्याचे समोर येत आहे .  आढळलेल्या ९ रुग्ण कामोठे,कळंबोली व नवीन पनवेल येथील नागरिक आहेत.
   पनवेल महानगरपालिकेचे कोरोना बाबतची आकडेवारी दिवसेंदिवस वाढत चालली आहे .
   आज कामोठे सेक्टर-७ येथील २३ वर्षीय १ व्यक्ती कोहिंड-१९ पॉझिटिक आलेली आहे. सदर व्यक्तीचे वडील बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत असून यापूर्वी ते कोविड-१९ पोसिटीव्ही आले होते. त्यांच्यापासूनच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
  कामोठे सेक्टर-१९ येथील ३२ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिन आलेलो आहे. सदर महिला सेंट जॉर्ज हॉस्पीटलमध्ये स्टाफ नर्स म्हणून कार्यरत आहे. सदर महिलेला कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
 कामोठे सेक्टर-२१ येथील एकाच कुटुंबातील ३३ वर्षीय १ महिला तसेच त्यांची ७ वर्षीय व १ वर्षोय असे २ मुले कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेले आहेत. त्यांचे कुटुंब प्रमुख हे USV फार्मा कंपनी, गोवंडी येथे कस्टम मॅनेजर म्हणून कार्यरत असून ते यापुर्वो कोव्हिड-१९ पॉझिटिक आलेले होते. त्यांच्या पासूनच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
  त्याचप्रमाणे कामोठे सेक्टर-११ येथील ३२ वर्षीय १ महिला कोकिङ-१९ पॉझिटिक आलेली आहे. त्यांचे भाऊ बृहन्मुंबई महानगरपालिकेमध्ये सफाई कामगार म्हणून कार्यरत असून ते यापूर्वी कोविड१९ पाझिटिव्ह आलेले होते. त्यांना त्यांच्या भावापासूनच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
  तसेच कामोठे सेक्टर-३४ येथील ३६ वर्षीय व्यक्ती कोविड-११ पॉझिटिव आलेली आहे. सदर व्यक्ती USV फार्मा कंपनी, गोवंडी येथे असिस्टंट मॅनेजर म्हणून कार्यरत आहे. सदर व्यक्तीला कामाच्या ठिकाणीच संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
 कळंबोली सेक्टर-४ येथील ३५ वर्षीय १ व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्तीचा भाऊ यापुर्वी पोलिस कर्मचारी असून यापूर्वी ते कोव्हिड-१९ पॉझिटिव आले होते. भावापासूनच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
  नविन पनवेल सेक्टर-१७ येथील २२ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिक आलेली आहे. सदर महिला मेंदू विकार तपासण्यासाठी सायन हॉस्पीटल, मुंबई येथे गेली होती. सदर ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

   तर चार रुग्ण बरे झाल्याचे माहितीत समोर येत आहे.
  पनवेल तक्का येथोल १ व्यक्ती याआधी कोव्हिड-१९ पोसिटीव आली होती. सदर व्यक्तीची कोव्हिड-१९ ची अंतिम चाचणी निगेटिव्ह आली असून ते पूर्णपणे बरे झाले आहेत. त्यांना आजरोजी घरी सोडण्यात आले आहे.. तसेच
 पनवेल तक्का येथील व्यक्ती याआधी कॉकिड-१९ पॉझिटिक आली होती. सदर व्यक्तीची कोविड-१९ ची अंतिम चाचणी नेटिक आली असून ते पुर्णपणे बरे झाले आहेत.
 पनवेल येथील १ महिला याआधी कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आल्या होत्या. सदर महिलेची कोव्हिड-१९ ची अंतिम चाचणी नेगेटिव्ह आली असून त्या पुर्णपणे बन्या झाल्या आहेत. त्यांना आजरोजी घरी सोडण्यात आले आहे. नविन पनवेल येथील व्यक्ती याआधी काविड-१९ पॉझिटिव आली होती. सदर व्यक्तीची कोन्हिङ-१९ ची अतिम चाचणी निगेटिव्ह आली असून ते पुर्णपणे बरे झाले आहेत. अन्य दुर्दम्य आजाराच्या उपचारासाठी सध्या ही व्यकती Non-Covid Ward मध्ये उपचार पेत आहेत.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0