कोरोनाच्या नियोजनाबाबत ठाकरे सरकार अपयशी : प्रविण दरेकर यांचा आरोप - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

कोरोनाच्या नियोजनाबाबत ठाकरे सरकार अपयशी : प्रविण दरेकर यांचा आरोप

कोरोनाच्या नियोजनाबाबत ठाकरे सरकार अपयशी :

 प्रविण दरेकर यांचा आरोप

 पनवेल : प्रतिनिधी                                                                                                                 लढवय्या रोखठोक


     महाराष्ट्रात कोरोनाचा आकडा दिवसेंदिवस वाढत आहे मात्र या महामारी बाबत परिपूर्ण नियोजन करणे गरजेचे असून याबाबत ठाकरे सरकार पूर्णतः अपयशी ठरले असल्याचा आरोप विरोधी पक्षनेते प्रवीण दरेकर यांनी केला आहे ते पनवेल येथील पत्रकार परिषदेत बोलत होते .
   राज्यात कोरोनाच्या रुग्णा बाबत होत असलेली गैरसोय व विविध समस्या बाबत सरकारकडे
योग्य असे नियोजनाचा आराखडा असताना देखील कोणत्याही प्रकारे याकडे गांभीर्याने न पाहता केवळ गोरगरीब व मध्यमवर्गीयांना  शून्य नियोजनाचा त्रास होत असून याबाबत सरकारला जनता नक्की धडा शिकवेल असे त्यांनी सांगितले .
 कोरोना योद्धा म्हणून सेवा देणारे पोलीस , डॉक्टर , परिचारिका यांच्यावरच कोरोनाचा अधिक प्राधुरभाव  पहावयास मिळत आहे ,  त्यामुळे अशा योध्याचं सरंक्षणन करण्यासाठी अपयशी ठरलेल्या सरकारचा धिक्कार असल्याचे सणसणीत उत्तर दरेकरांनी दिले .
  विरोधीपक्ष नेते प्रविण दरेकर हे कॊरोनाच्या समस्से बाबत आज पासून रायगड  ,रत्नागिरी , सिंधुदुर्ग च्या दौऱ्यावर आहेत या प्रसंगी आज सकाळी कळंबोली एम जी एम रुग्णालयाला भेट देऊन त्या ठिकाणची त्यांनी परिस्थिती जाणून घेतली व त्यानंतर पत्रकार परिषदेच्या माध्यमातून सरकारवर हल्ला चढवला .
 यावेळी माजी राज्य मंत्री रवींद्र चव्हाण, आमदार प्रशांत ठाकूर, पनवेलच्या महापौर डॉ. कविता चौतमोल, महेश बालदी, निरंजन डावखरे,प्रमोद जठार उपस्थित होते .

 
   

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0