१० रुग्ण कोरोना मुक्त : तर १२ नवीन रुग्णांची भर
२ रुग्णांचा मृत्यू : पनवेल कोरोना आकडा २७१
पनवेल : प्रतिनिधीलढवय्या रोखठोक
पनवेल महानगरपालिका परिसरातील आज १० रुग्णांनी कोरोना वर मात केली असून हे १० रुग्ण बरे होऊन आपल्या घरी परतले आहेत .
त्यामध्ये कामोठे येथील ३ , खारघर येथील ३ , कळंबोली येथील २ , पनवेल येथील १ तर नवीनपनवेल येथील १ रुग्ण असे १० रुग्ण बरे होऊन घरी परतले आहेत ही सकारात्मक बातमी असली तरी आज पनवेल महानगरपालिका हद्दीत नवीन १२ रुग्ण आढळून आले आहेत .
तर कलंबोली व कामोठे येथील २ व्यक्तींचा कोरोनाने मृत्यू झालेला आहे .
खारघर सेक्टर २० हावरे गुलमोहर येथील १ तर खारघर सेक्टर १५ येथील घरकुल मातृछाया येथील एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती कोरोना पोसिटिव्ह आल्या आहेत .
कामोठे परिसरातील सेक्टर ५ याठिकाणी १ व्यक्ती कोरोना पोसिटिव्ह तर कामोठे सेक्टर १० येथे एकाच कुटुंबातील २ तर कामोठे सेक्टर ११ या ठिकाणी एकाच कुटुंबातील ३ व्यक्ती कोरोना पोसिटिव्ह आढळले आहेत .
त्याच प्रमाणे कामोठे येथील सेक्टर १७ येथे १ व्यक्ती कोरोना पोसिटिव्ह आढळली आहे .
तर कळंबोली सेक्टर १५ येथील पाम विहार सोसायटी येथे १ व्यक्ती कोरोना पोसिटिव्ह आढळली आहे .
*दोघांचा मृत्यू*
कळंबोलीतील सेक्टर ११ गुरुकुटीर येथे १ व्यक्ती पोसिटिव्ह आढळली होती या व्यक्तीचा मृत्यू झालेला आहे तर कामोठे सेक्टर ११ येथील १ व्यक्ती कोरोना पोसिटिव्ह आढळली होती या व्यक्तीचा देखील मृत्यू झालेला आहे .