पनवेल उरण क्षेत्रात एकूण ३८ कोरोना रुग्णांची नोंद : एका महिलेचा मृत्यू - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेल उरण क्षेत्रात एकूण ३८ कोरोना रुग्णांची नोंद : एका महिलेचा मृत्यू



पनवेल उरण क्षेत्रात एकूण ३८ कोरोना  रुग्णांची नोंद  :  एका  महिलेचा मृत्यू

पनवेल : प्रतिनिधी

लढवय्या रोखठोक


पनवेल महानगरपालिका तसेच पनवेल ग्रामीण भागातली परिस्थिती दिवसेंदिवस बिकट होताना दिसत आहे त्यामुळे कोरोना बाबत आता चिंता व्यक्त केली  जात आहे .
 या भागांमध्ये कोरोना ने आपला आहाकार माजवायला सुरुवात केलेली आहे .
 प्रशासनाने याबाबत योग्य ती खबरदारी घेत नागरिकांना सुरक्षित घरी राहण्याचे आव्हान केलेले असले तरी नागरिकांच्या हलगर्जीपणामुळे हा आकडा कुठेतरी वाढताना दिसत आहे.
  पनवेल महानगरपालिका तसेच पनवेल ग्रामीण  आणि उरण भागात एकूण आज कोरोना चे ३८ रुग्ण आढळून आले आहेत यामध्ये पनवेल महानगरपालिका क्षेत्रात १३ रुग्ण तर पनवेल ग्रामीण व उरण भागात एकूण २५ रुग्णांचा समावेश आहे . तसेच पनवेल महानगरपालिका  क्षेत्रातील एका कोरणा बाधित महिलेचा मृत्यू झालेला आहे
  पनवेल महानगरपालिका क्षेत्रातील खारघर, कळंबोली, नवीन पनवेल , कामोठे, याठिकाणी आढळलेल्या १३ रुग्णांपैकी खारघर परिसरात एकूण ४ रुग्ण , तर कळंबोली परिसरात १ रुग्ण त्याचप्रमाणे  नवीन पनवेल परिसरात ६ रुग्ण व कामोठे परिसरात २ रुग्णांची नोंद आहे तर पनवेल ग्रामीण भागाचा विचार केला तर याठिकाणी कोप्रोली येथे २ रुग्ण , शिरढोन याठिकाणी १ रुग्ण , विचुंबे याठिकाणी १ रुग्ण , वहाळ याठिकाणी १ रुग्ण पालीदेवद सुकापुर या ठिकाणी ३ रुग्ण तर केळवणे याठिकाणी १ रुग्ण तर उरण परिसरातील
करंजा, सुरकीचापाडा , कासवलेपाडा , कोंढरी पाडा , नवापाडा या उरण भागातील  क्षेत्रात एकूण १६ रुग्ण आढळलेले आहेत



महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0