"रॉबिन हुड"आर्मी जोपासतेय सामाजिक बांधिलकी
कळंबोली : (संतोष मोकल)
लढवय्या रोखठोक
सध्या संपूर्ण जगात कोरोना नावाच्या विषाणूने थैमान घातले आहे, त्यामुळे सर्वत्र बंद पुकारण्यात आलं आहे. अश्या परिस्थितीत अनेक लोकावर उपासमारी ओढवलेली आहे.
अश्यावेळी बऱ्याच संघटना जेवण, पाणी आणि जीवनावश्यक वस्तूंचा पुरवठा करत आहेत. अशातच रॉबिन हूड आर्मीने देखील सामाजिक बांधिलकी जोपासत पुढाकार घेत भुकेल्यांची भूक भागवत आहे .
या संस्थेचे दिपक सिंग यांच्या माध्यमातून खारघर मध्ये कार्यरत असणाऱ्या या संस्थेच्या माध्यमातून संपूर्ण नवी मुंबई परिसरात जाऊन जेवण व अन्नधान्याचा पुरवठा करताहेत. ज्यांचे हातावर पोट आहे अशा सर्व गरजूंची भूक भागवण्यासाठी सध्या ही संस्था गरजूंना मोलाचं सहकार्य करताना दिसत आहे .
कळंबोली येथील श्रीराम सामजिक विकास मंडळाने त्यांना संपर्क साधून मदतीचे आव्हान केले होते यावेळी तात्काळ दिपक सिंग ह्यांनी दिनांक आपल्या टिम सोबत येऊन हातावर पोट भरणाऱ्या कुटूंबाना अन्नधान्य वाटप केले. भाजी व्यवसाईक , माथाडी कामगार , रिक्षा चालक अशा लोकांना कमीतकमी दोन आठवडे पुरेल एवढ अन्नधान्य देण्यात येत आहे.
सध्या ही संस्था दररोज १००० लोकांना जेवणाची व्यवस्था करत असल्याचे संस्थेचे दीपक सिंग यांनी सांगितले . ह्या संस्थे मध्ये बरेच डॉक्टर, इंजिनिअर,वकील,न्यायाधीश, पोलीस कर्मी, अश्या विविध क्षेत्रातील लोक आहेत. तसेच जेव्हा ही संस्था मदत करण्यासाठी जाते त्यावेळी त्यांच्या सोबतीला पोलीस कर्मी व आरोग्य विभागाची लोक असतात. शासनाने घालून दिलेल्या सर्व अटींनुसार हे काम करतात.