पनवेल ग्रामीण मध्ये कोरोनाचे ९ रुग्ण
ग्रामीण कोरोनाची आकडेवारी ९० वर
पनवेल : प्रतिनिधी
लढवय्या रोखठोकपनवेल ग्रामीण भागात आज कोरोनाचे ९ नवीन रुग्ण आढळले आहेत
त्यामध्ये पालीदेवद सुकापूर निम्बेश्वर सोसायटी येथील एकाच कुटुंबातील ४ रुग्ण , उलवे सेक्टर १४ येथील १ रुग्ण तर करंजाडे येथील सेक्टर २ येथील जय शिवम आर्केड येथील एकाच कुटुंबातील ४ रुग्णांचा समावेश आहे
असे एकूण ९ रुग्ण पनवेल ग्रामीण भागात आढळले आहेत तर पनवेल ग्रामीण भागातील कोरोनाचा आकडा आता ९० झाला आहे .