पनवेल ग्रामीणमध्ये कोरोनाचे ६ रुग्ण . मातोश्री बंगल्या शेजारी आढळला रुग्ण . पनवेल : संजय कदम - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेल ग्रामीणमध्ये कोरोनाचे ६ रुग्ण . मातोश्री बंगल्या शेजारी आढळला रुग्ण . पनवेल : संजय कदम

पनवेल ग्रामीणमध्ये कोरोनाचे ६ रुग्ण .
  मातोश्री बंगल्या शेजारी आढळला रुग्ण .
पनवेल : संजय कदम
लढवय्या रोखठोक

पनवेल महानगर पालिकेच्या प्रमाणे पनवेल ग्रामीण परिसरात देखील कोरोना रुग्णांची संख्या वाढत आहे पनवेल ग्रामीण भागात आज कोरोनाचे ६ नवे रुग्ण आढळले आहेत . यात एक रुग्ण मातोश्री बंगल्याच्या परिसरात आढळलेला आहे .
  करंजाडे येथील  ४३ वर्षीय महिला कोव्हिड-१९ पॉझिटीव्ह आली आहे. तसेच सदर महिलेच्या कॉन्टॅक्ट ट्रेसिंगची माहिती जमा करण्याचे काम सुरु आहे. त्याच प्रमाणे विचुंबे येथील ५३ वर्षीय व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटीव्ह आली आहे. सदर व्यक्ती मातोश्री बंगला, मुंबई येथे कार्यरत आहे. सदर व्यक्तीस मातोश्री बंगल्याच्या बाजूचा चहावाला याच्यापासून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
तसेच   सेक्टर ५, उलवे येथील ५७ वर्षीय महिला कोव्हिड-१९ पॉझिटीव्ह आली आहे.
 सदर महिला नेरुळ-१, नागरी प्राथमिक आरोग्य केंद्र येथे कार्यरत आहे. सदर महिलेस कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
 पालीदेवद सुकापूर येथील ३५ वर्षीय व्यक्ती कोव्हिड-१९ पॉझिटीव्ह आली आहे. सदर व्यक्ती मुंबई येथे पालिस विभागात कार्यरत आहे. सदर व्यक्तीस कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
 सेक्टर १, करंजाडे येथील ५४ वर्षीय व्यक्ती कोविड-१९ पॉझिटीव्ह आली आहे. सदर व्यक्ती मुंबई महानगरपालिकेत कार्यरत आहे. सदर व्यक्तीला कामाच्या ठिकाणी संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
  मिथीली होम्स, प्लॉट १४०, सेक्टर ४, करंजाडे येथील ३२ वर्षीय महिला कोव्हिड-१९ पॉझिटीव्ह आली आहेत. सदर महिलेचे पती हे याआधी कोव्हिड-१९ पॉझिटीव्ह आलेले आहेत. सदर महिलेस त्यांच्या पतीपासून संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.

महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0