शहरातील हवेच्या प्रदूषणाबाबत : सुदाम पाटील यांचे आरोग्यमंत्र्यांना निवेदन
कळंबोली : प्रतिनिधी
संतोष मोकल
लढवय्या रोखठोक
सध्या संपुर्ण जग कोरोना सारख्या महाभयंकर रोगाशी लढत आहे.
अश्यातच मागील दोन तीन दिवसांपासून कळंबोली , पनवेल सह आजूबाजूच्या परिसरात भयंकर वास पसरत असून नागरिकांनी संताप व्यक्त केला आहे, रात्री अचानक येणाऱ्या हवेच्या दुर्गंधी मुळे पनवेल मधील जनतेला नाहक त्रास होत आहे, त्या दुर्गंधी मूळे श्वसनाचा त्रास परिसरातील नागरिकांना होत आहे.
शहरांच्या बाजूला असलेल्या औद्योगिक वसाहती मधून काही केमिकल कंपनीच्या सांडपाण्याच्या व हवेतील प्रदूषणाच्या उग्रवासामुळे
नागरिककांचा जीव घुसमटत आहे . काही कंपन्यांच्या मनमानी कारभारामुळे कंपनी व्यवस्थापन नागरिकांच्या जीवाशी खेळत असल्याचा आरोप आहे.
याच अनुषंगाने कांग्रेसचे पनवेल जिल्हा कार्याध्यक्ष सुदाम पाटिल ह्यांनी महाराष्ट्राचे आरोग्यमंत्री राजेश टोपे ह्यांना विनंती केली पूर्वक अर्ज करण्यात आला आहे
परिसरात रात्री पसरणाऱ्या उग्रवासाने नागरिक हैराण झाले असताना या विषारी दुर्गंधीमुळे एखाद्यास श्वसनाचा त्रास होऊ शकतो व त्याला सध्याच्या परिस्थितीत हॉस्पिटलमध्ये जाने देखील अवघड आहे त्यामुळे मोठी समस्या उभी राहू लागली आहे.
त्यासाठी आपण लवकरात लवकर छुप्यापद्धतीने प्रदूषण करणाऱ्या अश्या कंपन्यांच्या विरोधात कडक कारवाई करून पनवेल करांची या तरसातून सुटका करावी. अशी विनंती करण्यात आली आहे.