पनवेल महानगरपालिका हद्दीत ९ कोरोना रुग्ण आढळले .: ९ महिन्याच्या चिमुकलीचा समावेश - लढवय्या रोखठोक

लढवय्या रोखठोक चा बुलंद आवाज !वाचा,सत्याची रोख-ठोक

संपादक:श्री.शैलेश चव्हाण


पनवेल-नवी मुंबई

Breaking

पनवेल महानगरपालिका हद्दीत ९ कोरोना रुग्ण आढळले .: ९ महिन्याच्या चिमुकलीचा समावेश

पनवेल महानगरपालिका हद्दीत
९ कोरोना रुग्ण : ९ महिन्याच्या चिमुकलीचा समावेश

पनवेल : लढवय्या रोखठोक
  प्रतिनिधी


    पनवेल महानगरपालिका क्षेत्रात चक्क ९ रुग्ण पोसिटीव्ह आढळून आलेले आहेत. तर  ८ रुग्ण बरे झाले आहेत 
 *कोरोना रुग्णांची सविस्तर माहिती*
  नविन पनवेल, सेक्टर-१३, अ-टाईप येथील ४६ वर्षीय १ व्यक्ती कोविड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर व्यक्ती रिक्षा ड्रायव्हर म्हणून काम करीत आहे  अपोलो हॉस्पीटल. बेलापूर येथे  त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
 कामोठे, सेक्टर-०९, क्षिरसागर सोसायटी येथील ३६ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिलेचे पती मानखुर्द, मुंबई येथे कार्यरत असून ते याआधी कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेले आहे. त्यांच्यापासूनच या महिलेला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
 कामोठे, सेक्टर-३५. अथर्व सोसायटी येथील ३० वर्षीय महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिला मानखुर्द पोलिस स्टेशन, मुंबई येथे पोलिस कर्मचारी म्हणून कार्यरत आहे. कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
  खारघर, सेक्टर-४. निकुंज सोसायटी येथील १ व्यक्ती दिनांक २४/०४/२०२० रोजी मुंबई येथेच कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली होती. सदर व्यक्ती शताब्दी हॉस्पीटल, गोवंडी येथे वैद्यकीय अधिकारी म्हणून कार्यरत असून कामाच्या ठिकाणीच त्यांना संसर्ग झाला होता. त्यामुळे ही व्यक्ती परस्पर उपचाराकामी मुंबई येथेच अंडमीट होतो. दिनांक २९/०४/२०२० रोजी ही व्यक्ती पुर्णपणे बरी होऊन त्यांना घरी सोडण्यात आले असून सध्या ती व्यक्ती त्यांच्या घरी आहे. तथापि, सदर व्यक्तीची माहिती शासनाकडून पनवेल महानगरपालिकेला दिनांक १३/०५/२०२० रोजी प्राप्त झाली आहे.
  कामोठे, सेक्टर-११. साईकृपा कॉम्प्लेक्स येथील ५५ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिलेचा पती याआधी कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेले होते. त्यांच्यापासूनच या महिलेला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
  पनवेल, सहयोग नगर, जोशी आळी येथील ४७ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिक आलेली आहे. सदर महिलेचा पती मुंबई येथे फार्मासिस्ट म्हणून कार्यरत असून ते याआधी कोंव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेले आहे. त्यांच्यापासूनच या महिलेला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
  खारघर, सेक्टर-३४. सिमरन सफायर्स येथील नऊ महिन्याची १ मुलगी कोव्हिड-१९ पॉझिटिव आलेली आहे. सदर मुलीचे वडील मुंबई एअरपोर्ट येथे सी आय एस एफ कर्मचारी म्हणून कार्यरत असून ते याआधी कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेले आहे.
त्यांच्यापासूनच या मुलीला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
  खारघर, सेक्टर-१०, लविस्ता सोसायटी येथील ३२ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिला अपोलो हॉस्पीटल, बेलापूर येथे उपचाराकामी गेली होती. सदर हॉस्पीटलमध्येच त्यांना संसर्ग झाल्याचा प्राथमिक निष्कर्ष आहे.
   कामोठे, सेक्टर-३४. मानसरोवर कॉम्प्लेक्स येथील ३२ वर्षीय १ महिला कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेली आहे. सदर महिलेच्या कुटुंबातील दोन महिला याआधी कोव्हिड-१९ पॉझिटिव्ह आलेल्या होत्या. त्यांच्यापासूनच या महिलेला संसर्ग झाल्याचा अंतिम निष्कर्ष आहे.
   तर आज ८ रुग्ण बरे झालेले आहेत त्यात कामोठे येथील एकूण ७ व्यक्तींची कोव्हिड-१९ ची अंतिम चाचणी निगेटिव्ह आली असून ते पुर्णपणे बरे झाले आहेत. त्या सर्वाना आजरोजी घरी सोडण्यात आले आहे.
 तर तळोजा येथील  १ महिलेची कोविड-१९ ची अंतिम चाचणी निगेटिव्ह आली असून ती पुर्णपणे बरी झाली आहे. त्या महिलेला आजरोजी घरी सोडण्यात आले आहे.महाराष्ट्र

Pages

google.com, pub-8817539848302738, DIRECT, f08c47fec0942fa0